Sunday, May 19, 2024
Homeनाशिककोयत्याचा धाक दाखवून लाखोंची रक्कम पळविली; आरोपी गजाआड

कोयत्याचा धाक दाखवून लाखोंची रक्कम पळविली; आरोपी गजाआड

सिन्नर। प्रतिनिधी Sinnar

माळेगाव एम. आय. डी. सी. परिसरात कोयत्याचा धाक दाखवून कामगारांच्या पगाराचे 22 लाख 53 हजारांची रोकड असलेली बॅग चोरून लंपास झालेल्या चोरट्याला जेरबंद करण्यात एमआयडीसी पोलिसांना यश आले आहे.

- Advertisement -

भगवती स्टील कंपनीचे कॉन्ट्रक्ट सुपरवायझर चंद्रदीपकुमार सिंग, रा. संजीवनी नगर, सिन्नर हे त्यांचे कंपनीतील कामगार दिपचंद्र जयस्वार यांचे मोटर सायकलवर मागे बसून भगवती स्टील कंपनीतील कामगारांचे पगाराची रक्कम २० लाख ५३ हजार रूपये घेवून सिन्नर येथून माळेगाव औद्योगिक वसाहतीतजात असतांना अनोळखी चोरटयाने हातात कोयता घेवून चंद्रदीपकुमार सिंग यांचे समोर येवून कोयत्याचा धाक दाखवून रोख रक्कम असलेली कापडी पिशवी हिसकावून जबरीने चोरून नेली होती.

नाशिकहून ‘या’ पाच शहरांसाठी विमानसेवा होणार सुरु

या बाबत MIDC सिन्नर पोलीस ठाणेस गुरनं २११/२०२३ भादवि कलम ३९२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर घटनेच्या अनुषंगाने MIDC सिन्नर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शाम निकम यांनी पोलीस पथकासह घटनास्थळास भेट देवून भगवती स्टील कंपनीचे आजुबाजूचे परिसराची बारकाईने पाहणी केली.फिर्यादीने सांगितल्या प्रमाणे एक काळ्या रंगाचे पल्सर मोटर सायकलवर काळे टी-शर्ट व निळे रंगाची पॅन्ट परिधान केलेल्या इसमाने सदरचा गुन्हा केला असल्याची खात्री झाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक शाम निकम यांना संशयित इसमाचे वर्णनावरून मिळालेल्या गुप्त बातमीनुसार सदरचा गुन्हा हाआदी सोनवणे, रा. शांतीनगर, सिन्नर याने केला असल्याची खात्रीशीर माहीती मिळाली. त्याचा शोध घेतला असता तो घटना घडल्यापासून फरार असल्याचे समजले.

शालेय गणवेशाबाबत शिक्षणमंत्री केसरकर यांनी केली ‘ही’ महत्वाची घोषणा; वाचा सविस्तर

सदर इसम हा सिन्नर येथून त्याचे पत्नीस घेवून बाहेरगावी वास्तव्यास जाणार असल्याची बातमी पोलीस पथकास मिळाली होती, त्याप्रमाणे पोलीसांनीशांतीनगर परिसरात रात्रभर सापळा रचून त्यास शिताफीने ताब्यात घेतले. त्यास त्याचे नाव विचारले असता,त्याने त्याचे नाव आदित्य एकनाथ सोनवणे, वय २४, रा. शांतीनगर, सिन्नर, मुळ रा. समशेरपूर, ता. अकोले, जि. अहमदनगर असे सांगितले.यातील आरोपी वरील गुन्हयाचे तपासात विश्वासात घेवून चौकशी केली असता,त्यानेच सदर गुन्हा केला असल्याची कबूली दिली आहे. सदर गुन्हयातील जबरीने चोरून नेलेली रोख रक्कम आरोपीने लपवून ठेवली असल्याबाबत सांगितल्याप्रमाणे पोलीस पथकाने रोख १८ लाख ९४ हजार ५०० रूपये हस्तगत केले आहे.

पंढरपूर, अक्कलकोट तीर्थक्षेत्र विकास आराखड्यास मान्यता

यातील आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याचेवर अहमदनगर जिल्हयात गुन्हे दाखल असलेबाबत माहीती मिळाली आहे. सदर आरोपीस MIDC सिन्नर पोलीस ठाणेकडील वरील गुन्हयात अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक शाम निकम यांचे पथक करीत आहेत. नाशिक ग्रामीण जिल्हा

पोलीस अधीक्षक शहाजी उमाप, अपर पोलीस अधीक्षक माधुरी केदार-कांगणे व उपविभागीय पोलीस अधिकारी समीरसिंग साळवे, पोलीस निरीक्षक हेमंतपाटील यांचे मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे एम. आय. डी. सी. सिन्नर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शाम निकम, सपोनि तुषार गरूड, सपोनि संदेश पवार, पोना भगवान शिंदे, धनाजी जाधव, सागर गिते, नवनाथ चकोर, पोकॉ शशिकांत निकम, विनोद जाधव, चापोकॉ विक्रम टिळे तसेच पोना हेमंत गिलबिले, प्रदीप बहीरम यांचे पथकाने सदर गुन्हा उघडकीस आणलेला आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

पोलीस पथकाने केलेल्या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेवून पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी तपास पथकास २०,०००/-रू. चे बक्षीस जाहीर करून सर्वांचे अभिनंदन केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या