Wednesday, May 8, 2024
Homeमहाराष्ट्रलालबागच्या राजाच्या दरबारात पहिल्याच दिवशी बाचाबाची

लालबागच्या राजाच्या दरबारात पहिल्याच दिवशी बाचाबाची

मुंबई | Mumbai

आजपासून गणेश उत्सावाला सुरुवात झाली आहे. राज्यभरात गणेशोत्सवाची धूम मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. लाडक्या गणरायाचा जयघोष संपूर्ण राज्यात पाहायला मिळत आहे.

- Advertisement -

राज्याची राजधानी मुंबईत देखील गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळत असून, लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. पण लालबागच्या राजासमोर (Lalbaugcha Raja 2022) भाविक आणि सुरक्षा रक्षकांमध्ये बाचाबाची झाल्यानं या उत्साहाला गालबोट लागलं आहे.

मुखदर्शनाच्या रांगेतून जाताना हा वाद झाल्याची माहिती मिळत आहे. त्यानंतर पोलिसांनी समजुत काढून हा वाद मिटवला आहे. महिला भाविक आणि महिला सुरक्षारक्षकांत हा प्रकार घडला आहे.

यंदा लालबागच्या राजाचा दरबार अयोध्येतील प्रभू श्री राम मंदिराच्या देखाव्याने सजला आहे. पहाटे ५ वाजता लालबागच्या राजाची विधिवत पूजा करण्यात आली. त्यानंतर पहाटे ६ वाजता लालबागच्या राजाचे दर्शन गणेशभक्तांसाठी सुरु करण्यात आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या