Thursday, May 28, 2026
Homeब्रेकिंग न्यूजलासलगाव बाजार समितीत लाल कांद्याची आवक सुरु

लासलगाव बाजार समितीत लाल कांद्याची आवक सुरु

- Advertisement -

लासलगाव । वार्ताहर Lasalgaon

लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात नवीन लाल कांद्याची आवक सुरू झाली असून या नवीन कांद्याला किमान ४०० कमाल ९०१ तर सरासरी ८०० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला.

केंद्र सरकारने नाफेड आणि एनसीसीएफ च्या माध्यमातून खरेदी केलेला कांदा शहरी भागामध्ये विक्री करता उपलब्ध झाल्याने कांद्याच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात घसरण पाहायला मिळाली.

मागील महिन्यात सरासरी १८०० रुपये प्रत्येक क्विंटलने विक्री झालेला उन्हाळ कांदा सध्या ११०० रुपये प्रति क्विंटल दराने विक्री होत आहे सध्या कांद्याला मिळणाऱ्या दरातून उत्पादन खर्चही निघत नसल्याने आर्थिक बजेट कोलमडल्याने उत्पादकांमध्ये कमालीची नाराजी पसरली आहे.

या हंगामात कांद्याचे बंपर उत्पादन झाल्याने तुलनेत कांद्याचा निकस कमी प्रमाणात होत आहे. कांदा निर्याती मध्ये अनेक अडथळे येत असल्याने मागणीच्या तुलनेत पुरवठा अधिक होत आहे त्यामध्ये नाफेड एनसीएफने खरेदी केलेला कांदा देशावर बाजारामध्ये किरकोळ विक्रीसाठी येत असल्याने कांदा दरात सातत्याने घसरण होत आहे त्यात आता भर नवीन लाल कांद्याची आवकही सुरू झाल्याने बाजार भाव स्थिर राहतील अशी शक्यता फारच कमी असल्याचे मत जाणकार व्यक्त करीत आहे.

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत आज ३९७ वाहनांतून ५८४० क्विंटल उन्हाळ कांदा आवक होऊन किमान ५०० कमाल १६०० रुपये तर सरासरी ११५१ रुपये प्रती क्विंटल दर मिळाले.

ताज्या बातम्या

SET Exam 2026 – सेट परीक्षेची तारीख जाहीर

0
पुणे | प्रतिनिधी Pune सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट विभागातर्फे महाराष्ट्र व गोवा राज्यातील उमेदवारांसाठी घेतली जाणारी सहाय्यक प्राध्यापक पदासाठीची राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (सेट परीक्षा)...