Friday, May 3, 2024
Homeनाशिकलासलगाव रेल्वे स्थानकांचे रुपडे बदलणार

लासलगाव रेल्वे स्थानकांचे रुपडे बदलणार

लासलगाव | प्रतिनिधी

रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण व्हावे यासाठी रेल्वे बोर्डाने अमृत भारत स्टेशन योजना आणली आहे. या योजनेंतर्गत लासलगाव रेल्वे स्थानकांचे अत्याधुनिकरण होणार आहे. स्वातंत्र्यदिनी १५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे व्हिडीओ काॅन्फरन्सद्वारे कामाचा शुभारंभ करणार आहे. लासलगाव रेल्वे स्थानकाचा या अमृत भारत स्टेशन योजनेत समावेश झाल्याने येत्या काही दिवसात या रेल्वे स्थानकात सर्व प्रकारच्या सोयी -सुविधा निर्मिती करण्याच्या कामाला प्रत्यक्ष प्रारंभ होणार आहे.

- Advertisement -

वर्षभरात लासलगाव रेल्वे स्थानकाचे रुपड पूर्णतः बदलणार आहे. यामुळे शहराच्या आर्थिक भरभराटीस चालना मिळणार आहे. लासलगाव स्थानकाचा यात समावेश करण्यासाठी माजी जी प सदस्य तथा लासलगाव मंडल अध्यक्ष डी के नाना जगताप,सुवर्णा जगताप यांनी प्रयत्न केले.

या योजनेमुळे स्थानकांचा कायापालट केला जाणार आहे. यामुळे या स्थानकांचा चेहरामोहरा बदलणार आहे. दीर्घकालीन दृष्टिकोनातून स्थानकांचा विकास करण्यावर यात भर दिला जाणार आहे. स्थानकांचा दीर्घकालीन विकास आराखडा तयार करून सुविधांचे नियोजन केले जाणार आहे. प्रत्येक स्थानकाचा विकास करताना तेथील रोजची सरासरी प्रवासी संख्या लक्षात घेऊन नियोजन करण्यात येणार आहे. याचबरोबर स्थानकाची सध्याची रचनाही विचारात घेतली जाणार आहे. प्रामुख्याने प्रवासी केंद्रित सुविधा स्थानकांवर विकसित केल्या जातील.

स्थानकाच्या बाह्य रुपासोबत अंतर्गत भागातही सुधारणा केल्या जाणार आहेत

स्थानक परिसरातील वाहतूक सुधारणा, नविन बुकिंग ऑफिस, स्थानक परिसराचे सुशोभीकरण न्यु फुट ओव्हर ब्रीज लिफ्ट सह, प्लॅटफॉर्म कोच इंडिकेटर, इलेक्ट्रॉनिक बोर्ड डिस्प्ले, स्थानक प्रवेशद्वारांचा विकास, स्थानकावर व्हीआयपी प्रतीक्षागृहांची उभारणी, अंतर्गत रचनेत सुधारणा स्वच्छतागृहांमध्ये सुधारणा, गार्डन, कांदा लोडींग काँक्रीटीकरण, पार्किंग व्यवस्था.

येत्या वर्षभरात लासलगाव रेल्वे स्थानकाला नव्याने झळाळी मिळणार असून स्टेशनचे रूपडे पूर्णतः बदलले जाणार आहे. रेल्वे स्टेशनच्या आधुनिकीकरणामुळे प्रवाशांना रेल्वे स्टेशनवर विशेष सुविधा मिळणार आहे. याबाबतची माहिती माजी जि प सदस्य डी के जगताप,भाजपा नेत्या सुवर्णा जगताप,नितीन शर्मा यांनी दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या