लासलगाव | वार्ताहर Lasalgaon
लासलगावसह 16 गावांना पाणीपुरवठा करणारी योजना गेल्या आठ दिवसांपासून विज बिल न भरल्याने पाणीपुरवठा योजना ठप्प झाली आहे. या कारणामुळे लासलगाव शहराला होणारा पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. तब्बल 47 लाख रुपयांची थकबाकी असल्याने वीज पुरवठा खंडित झाल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी लिंगराज जंगम यांनी दिली.
गेल्या अनेक वर्षापासून 16 गाव पाणीपुरवठा योजनेला गळतीचे ग्रहण लागले होते मात्र माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नानंतर तब्बल 20 कोटी रुपयांचा निधी आणून नवीन पाईपलाईन बसवली. महावितरण कडून विज बिल थकल्याने 16 गाव पाणीपुरवठा योजनेची कनेक्शन कापण्यात आले आहे . यामुळे लासलगावसह लाभार्थी गावाला होणारा पाणीपुरवठा गेल्या पाच ते सात दिवसांपासून ठप्प झाला आहे. तर दुसरीकडे लासलगाव ग्रामपंचायतचे सरपंचांनी रोटेशन पद्धतीने आपला राजीनामा दिल्याने नवीन सरपंच निवडणूक कार्यक्रम 16 जानेवारी रोजी लागला आहे ग्रामपंचायत सदस्य सरपंच निवडणूक कार्यक्रमांमध्ये व्यस्त असताना नागरिक मात्र पाण्यासाठी त्रस्त असल्याचे दिसत आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा
सोळा गाव पाणीपुरवठा योजनेच्या ढिसाळ कारभारामुळे नांदूर मधमेश्वर धरणात मुबलक पाणी असताना वीज बिल थकल्याने पाणीपुरवठा ठप्प झालेला आहे. लासलगाव मधील नागरिकांकडून लवकरात लवकर पाणीपुरवठा सुरळीत व्हावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
वीज पुरवठा खंडित झाल्याने पाणी पुरवठा ठप्प झाले आहे. पण लवकरच वीज पुरवठा सुरळीत करण्यात आपण वरिष्ठांना भेटणार आहोत लवकर पाणीपुरवठा सुरळीत केला जाईल.
लिंगराज जंगम, ग्रामसेवक