Saturday, April 11, 2026
Homeदेश विदेशAir India Plane Crash: "MAYDAY… MAYDAY… NO POWER… NO THRUST…"; अपघातापूर्वी पायलटचा...

Air India Plane Crash: “MAYDAY… MAYDAY… NO POWER… NO THRUST…”; अपघातापूर्वी पायलटचा एटीसीला संदेश

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
एअर इंडियाच्या प्लेन क्रॅश घटनेमुळे सगळेच हादरले आहेत. याबाबत सतत काही ना काही अपडेट येत आहे. विमानाच्या अपघातात २७५ जणांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की या अपघातात एका प्रवाश्या व्यतिरिक्त बाकी कोणीही वाचू शकले नाही. हा अपघात होण्याआधी विमानाच्या कॉकपिटमधून एक भयानक ऑडिओ मेसेज आला होता. विमानाच्या पायलटचा हा मेसेज, जो विमान कोसळण्याचा काही क्षण आधी अहमदाबाद एअर ट्रॅफिक कंट्रोल (एटीसी) ला पाठवण्यात आला होता.

एअर इंडियाचे ड्रीमलाईनर AI-171 हे विमान नेमके कशामुळे कोसळले याबाबतीत विविध तर्क वितर्क लावले जात आहे. या घटनेची रोज नवनवीन माहिती समोर येत आहे. विमान पडण्यापूर्वी वैमानिक सुमित सभरवाल यांनी एटीसी अर्थात हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाला मेसेज पाठवला होता. त्यात त्यांनी विमान जमिनीच्या दिशेने जात असल्याचे कारण सांगितले होते.

- Advertisement -

अहमदाबाद विमानतळाच्या धावपट्टीवरून उड्डाण केल्यानंतर विमान काही क्षणात बीजे मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहाच्या इमारतीवर कोसळले. त्यानंतर मोठा स्फोट झाला आणि आगीच्या लोळांनी संपूर्ण परिसर कवेत घेतला. या घटनेत आतापर्यंत २७५ लोक मरण पावले आहेत. हे विमान निवासी क्षेत्रात कोसळ्याआधी वरिष्ठ पायलट कॅप्टन सुमित सभरवाल यांनी अहमदाबाद एअर ट्रॅफिक कंट्रोल (एटीसी) ला एक शॉर्ट एमर्जन्सी कॉल पाठवला.

फक्त पाच सेकंदांचा हा मेसेज कॉकपिटमध्ये पसरलेल्या दहशतीचे चित्रण करतो. ऑडिओमध्ये पायलट असे म्हणत असल्याचे ऐकू येते, “MAYDAY… MAYDAY… MAYDAY… NO POWER… NO THRUST… GOING DOWN…” याचा अर्थ मेडे…मेडे… वीज नाही…जोर नाही…खाली जातोय…”. विमानाला पुढे ढकलण्यासाठी जी प्रचंड ताकद लागते त्याला थ्रस्ट असे म्हणतात.. “नो थ्रस्ट” म्हणजे विमानाच्या इंजिनांमध्ये पुढे जाण्यासाठी कोणतीही शक्ती (थ्रस्ट) तयार होत नाहीये. इंजिन प्रचंड शक्ती निर्माण करते, जी विमानाला पुढे ढकलते, ज्यामुळे विमान हवेतून उडू शकते आणि वेगही वाढवता येतो.

जर विमान फारच गंभीर अडचणीत असेल अशावेळी MAYDAY CALL दिला जातो जसे की इंजिन फेल होणे, विमानात आग लागणे, हायजॅकची शक्यता, हवेत दुसऱ्या विमानाशी टक्कर होण्याचा धोका. अशा वेळी पायलट तातडीने रेडिओवर तीन वेळा “MAYDAY, MAYDAY, MAYDAY” असे उच्चारतो. हे केवळ एक अलार्म नाही, तर ‘विमान संकटात आहे आणि तात्काळ मदतीची गरज आहे’ याचा स्पष्ट संकेत असतो. हा संदेश एटीसी, विमानातील क्रू मेंबर्स आणि जवळच्या विमानांना दिला जातो. एकदा मेडे कॉल दिल्यानंतर, पायलट शक्य तितक्या तपशीलात संकटाची माहिती देतो. उदा. कुठला भाग बिघडला आहे, विमान कुठल्या ठिकाणी आहे, आपत्कालीन लँडिंग शक्य आहे का इत्यादी.

आता जर नो थ्रस्ट परिस्थिती निर्माण झाली असेल, तर त्याची कारणे अशी असू शकतात. पहिले म्हणजे इंजिन सुरू नसतील किंवा फक्त सुरू आहेत, पण पुढे ढकलण्यासाठी लागणारी ऊर्जा त्यात तयार होत नसेल. दुसरे म्हणजे विमानाला पुढे जाण्यासाठी आवश्यक असलेली शक्ती मिळत नाही. त्यामुळे विमान उडू शकत नाही किंवा हवेत वेगाने पुढे जाऊ शकत नाही. हे इंजिनातील तांत्रिक समस्येमुळे, इंधन नसले किंवा इंजिन बंद केल्यामुळे होऊ शकते.

नेमके कशी झाली दुर्घटना
दिनांक १२ जून रोजी दुपारी १:४० मिनीटांनी एअर इंडिया फ्लाइट AI-171 बोईंग ७८७-८ ड्रीमलायनर विमानाने गुजरातच्या अहमदाबादहून लंडनच्या गॅटविकला जाण्यासाठी उड्डाण केले. पण टेक-ऑफनंतर काही सेकंदातच विमान कोसळले. या अपघाता २४२ जण प्रवास करत होते. २३० प्रवासी, १० क्रू मेंबर्स आणि २ पायलट यांचा समावेश होता.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

सुनेत्रा

सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकरांकडून धोका? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, महाराष्ट्राचं...

0
पुणे | Puneनाशिकमधील अशोक खरात प्रकरणाचा तपास करण्यासाठी नेमलेल्या एसआयटीला मिळालेल्या तक्रारीमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. बीडमधील एका व्यक्तीने एसआयटीला पत्र पाठवून राज्याच्या...