Sunday, May 19, 2024
Homeजळगावलता दीदी, पुन्हा होणे नाही...

लता दीदी, पुन्हा होणे नाही…

भुसावळ Bhusaval । प्रतिनिधी

भारत रत्न (Bharat Ratna) गायनसम्राग्नी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचे 91 व्या वर्षी मुंबईत उपचारा दरम्यान, निधन (Died) झाले. त्यानंत संपूर्ण देश हळहळला आहे. त्यांच्या जाण्याने गीत व संगीत क्षेत्राचे (Music field) नुकसान झाले असून ‘दीदी, पुन्हा होणे नाही’ अशा भावना समाज मनातून व्यक्त होत आहे.

- Advertisement -

आवाजाचे एक युग संपले

देशातील अवाजाचे एक पर्व भारतरत्न लता दीदींच्या निधनाने सपले आहे. त्यांनी जुन्या कलाकारांपासून तर आतापर्यंतच्या कलाकारांच्या गीतांना आपला आवाज दिला आहे. व अजरामर केले आहे. देशातील एक रत्न हरवाले आहे. जात, धर्म, पंथाच्या पलीकडे जाउन त्यांनी गायिली. असे कमी लोक जन्माला येतात. अशा व्यक्ति पुन्हा होणे नाही. परमेश्वर त्यांच्या आत्म्याला शांती दोवो.

– आ. संजय सावकारे, भुसावळ.

देशाच्या गान कोकिळेचा आवाज हरपला

गेली अनेक दशके संगीत आणि गायनातून रसिकांना मंत्रमुग्ध करणारी मधुर आवाजाची धनी असलेली या देशाची गान कोकिळा लता दीदी आपल्याला कायमची सोडून गेली आहे. गायन आणि संगीत क्षेत्राची ही मोठी हानी आहे. त्यांचा आवाज अनेक शतके आम्हाला त्यांच्या अस्तित्वाची आठवण करून देईल. अश्या लतादीदी पुन्हा होणे नाही.

-प्रा सुनील नेवे, अध्यक्ष अटल प्रतिष्ठान, भुसावळ.

मौल्यवान रत्न हरपले

लता दीदी सगळ्यांच्या आवडत्या होत्या. तसेच शास्त्रोक्त पद्धतीने गायणाची पद्धत त्यांनी जोपासली होती. त्यांनी ती कधीच सोडली नाही. त्यांच्या रुपाने विश्वाला मिळालेले मौल्यवान रत्न हरपले आहे.

– चारुलता भालेराव, कथ्यक नृत्यांगणा, भुसावळ.

कठोर परिश्रमाने संगिताचा वारसा जपला

संपूर्ण विश्वात लता दीदींचा सुरेल आवाजाला तोड नव्हती. त्यांचे शास्त्रीय संगीत पक्के होते. त्यांची बरोबरी कोणी करु शकणर नाही. 70 च्या दशकातील त्यांची गाणे आजही सहज गुणगुणता येतात. त्या काळात आधुनिक साधने नसतांनाही त्यांनी गायनाचा वारसा टिकात आपली वेगळी छाप निर्माण केली. हे सोपे काम नव्हते.

– सुरेश पाटील, तबला विशारद भुसावळ.

दीदी, त्यांच्या गायनातून आपल्यासोबतच

दीदींच्या निधनाने संगीत व गायन क्षेत्राचे नुकसान झाले आहे. मात्र त्या गेल्या असे म्हणता येणार नाही. त्यांच्या अप्रतिम गायनातून त्या आजही आपल्या सोबत आहे. वयोमानाने प्रत्येक व्यक्ति जाणार हे नक्की आहे. मात्र त्यांचे कार्य मोठे आहे. त्या गेल्या असे मानण्याची गरज नाही तसेच त्याचे दु:ख ही वाटून घेऊ नये.

– शिरीष जोशी, संचालक श्रीराम संगित विद्यालय, भुसावळ

वसंतात गानकोकिळा निघून गेली

ऐन वसंतात गानकोकिळा आपल्यातून निघून गेली. भारतीय चित्रपट संगीतातला स्वर आज हरपला. लतादीदी शरीराने जरी आपल्यातून निघून गेल्या असल्या तरीही त्यांचा स्वर आणि त्यांची अजरामर गाणी येणार्‍या पिढीसाठी सदैव प्रेरणा देत राहतील. लतादीदींचा स्वर हा भारतीय संगीतातील एक अढळ असा धृवतारा आहे.

– मनोज कुळकर्णी.

तबला वादक, भुसावळ.

परिवारातील एक सदस्या गेल्या

ज्यांची गाणे एकत एकत आम्ही लहानाचे मोठे झालो. त्यांची गाणी एकून आयुष्यात नविन उर्जा निर्माण व्हायची, ज्यांच्या सुरानी जगभराचे कान आणि आत्मा तृप्त केला अशा लता दिदि आज गेल्याने आपल्याच परिवारातील एक सदस्य गेल्याची भावना निर्माण झाली आहे. अनेक युगातुन अशी दैवी व्यक्तीमत्व जन्माला येत असतात. त्या आज आपल्यातुन जरी गेल्या असल्या तरी त्या त्यांच्या सुरांनी सदैव आपल्या सोबत आणि येणार्‍या अनेक पिढ्यांसोबत असतील.

-संदीप वसंतराव पाटील

अध्यक्ष, अंतर्नाद प्रतिष्ठान, भुसावळ

पुढच्या जन्मातही त्या जीवनात स्वरांचे रंग भरतील

भारत रत्न लता मंगेशकर यांच्या निधनाची बातमी काळजाला चटका लावून जाणारी आहे. त्यांच्या जाण्यामुळे संगीत क्षेत्र आणि एकूणच संपूर्ण जगात विशेषतः एक पोकळी निर्माण झालेली आहे. पुढच्या जन्मातही त्यांच्या हातून पुन्हा एकदा संगीत क्षेत्राच्या माध्यमातून संपूर्ण जनमानसाची सेवा करून सर्वसामान्य जनतेच्या नीरस जीवनात सुरेल स्वरांचे रंग भरून मानवी जीवन समृद्ध करतील. दीदी आपल्यात नसल्यातरी, सुरांच्या माध्यमातून त्या कायमस्वरूपी अमर झाल्या आहेत.

सुनील पाठक, संगित रसिक, भुसावळ.

मधुर गीतांनी त्या अजरामर राहतील

भारताची गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या निधनाने भारतीय संगीत क्षेत्रात खूप मोठी आणि झाली आहे. लतादीदींनी कोट्यावधी लोकांच्या मनात गीतांच्या माध्यमातून आपला ठसा उमटविला होता, त्यांच्या मधुर गीतांनी त्या नेहमीसाठी भविष्यात अविरत स्मरणात राहणार आहे. लतादीदींनी मराठीतच नव्हे तर इतर भाषांमध्ये सुद्धा गीत गायन केले असल्याने जागतिक स्तरावर त्यांच्या सारखा आवाज भविष्यात होणार नाही.

– सुनील काळे, माजी नगराध्यक्ष वरणगाव.

संगीत क्षितिजावरील वरदान हरवलं

भारतीय संगीत क्षितिजावरील निसर्गाने दिलेले वरदान हरवलं! सप्तसुरांची ओळख करून देणारं एक कीर्तिमान रत्नाने लतादीदींच्या रूपाने कायमचा निरोप घेतला. असा आवाज पुन्हा पृथ्वीतलावर येणे अशक्यच, ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो व भारतीय संगीतप्रेमींना या धक्क्यातून सावरण्याचं धाडस परमेश्वर देवो.

-समाधान महाजन, जिल्हा प्रमुख शिवसेना, वरणगाव.

दैवी स्वर शांत झाला

गेल्या सात दशकाहून अधिक काळ जगभरातील अगणित संगित प्रेमींच भावविश्व समृद्ध करणारा लता दीदींचा दैवी स्वर आज अखेर शांत झाला. धर्म, भाषा, प्रांत, देश अशी सर्व बंधने तोडून प्रत्येकाच्या आयुष्यात अखंड आनंद भरणार्‍या स्वर मैफलीचे अखेरची भैरवी घेतली. नक्षत्रांचे हे देणे दिवंगताच्या प्रवासाला निघून गेले. संगीताच मुळ तृप्त होणारं प्रत्येक मन थंडावले आहे. लतादीदी लौकिकार्थान आपल्यातून निघून गेल्या असल्या तरी कालजयी सुरांच्या रुपानं गेल्या असल्या तरी त्यांच्या स्मृती चिरंतन राहतीलच.

– विवेक शिवरामे

संचालक, नुतन म्युझीक वरणगांव.

स्वर्गीय स्वरयज्ञ शांत झाला

अभिजात भारतीय संगीताचे कैलास लेणं म्हणून ज्यांचा उल्लेख करता येईल अश्या साक्षात स्वरसरस्वती भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनाने कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. कालचं आपण सर्वांनी सरस्वती पूजन केले परंतु आज माता सरस्वती अशी माघार घेईल असे वाटले नव्हते.. स्वर्गीय स्वर आज स्वर्गस्थ झाला.आज दीदी गेल्या, आता कधीही त्या आपल्याला दिसणार नाहीत पण तरीही आपल्या हजारो गीतांच्या माध्यमातून ही गानसरस्वती जगभरातील रसिकांच्या मनात अजरामर राहील यात शंका नाही.

-किरण सोहळे, संगीत विभाग प्रमुख, विवेकानंद प्रतिष्ठान संगीत विद्यालय

दीदींनी रसिकांच्या हृदयावर अधिराज्य केले

लता दिदींच्या निधनाने देशात शोककळा पसरली असून त्यांच्या जाण्याने देशाच, गीत व संगीत क्षेत्राचे फार मोठे नुकसान झालेले असून कधीही न भरणारी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांची जागा कोणीही घेऊ शकत नाही. त्यांनी रसिकांच्या हृदयावर अधिराज्य केले आहे.

– प्रा. संजय मोरे, प्रदेशाध्यक्ष सर्व शक्ती सेना

- Advertisment -

ताज्या बातम्या