Sunday, May 19, 2024
HomeजळगावVideo लतादीदी सौभद्र नाटकाच्या निमित्ताने आल्या होत्या पाचोऱ्यात

Video लतादीदी सौभद्र नाटकाच्या निमित्ताने आल्या होत्या पाचोऱ्यात

पाचोरा – प्रतिनिधी pachora

संगितावर राज्य करणाऱ्या (Bharat Ratna) भारतरत्न गानसम्राज्ञी स्व.लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांच्या अभिनयाला सुरवात पाचोऱ्यातून झाली आहे…

- Advertisement -

ज्या गाण्यामुळे त्यांनी हे यश मिळवले त्या गाण्याच्या करीयरची (अभिनयाची) सुरवात जळगाव जिल्ह्य़ातील पाचोरा शहरातुन केली आहे. मंगेशकराची त्या काळात आर्थिक परिस्थिती बिकट होती म्हणून गावां गावत जाऊन आपली कला सादर करीत होते.

१९३५ च्या दरम्यान लतादीदींचे वडील (Dinanath Mangeshkar) स्व.दिनानाथ मंगेशकर यांच्या बरोबर सौभद्र नाटकाच्या (Saubhadra Natak) निमित्ताने पाचोरा शहरात आले असता नाटकाच्या शो रात्री होता मात्र त्यावेळी नाटकातील नारदाची भुमिका करणारे पात्र आजारी झाले होते तेव्हा त्यांचे वडील खुप टेन्शन मध्ये असतांनाच स्वतः लतादीदींनी मी नारद होवु का म्हणून विनंती केली तेव्हा वडील म्हणाले अर्जुन किती मोठा आणि नारद लहान तरी पर्याय दुसरा नसल्याने शेवटी लतादीदींना नारदाची भुमिका करायला लागली आणि यात जे गाणे म्हटले त्या गाण्याला वन्समोर देखील मिळाला. ही आठवण आपल्या तरुण पणातील एका मुलाखतीत त्यांनी बोलुन दाखवली.

- Advertisment -

ताज्या बातम्या