Wednesday, May 8, 2024
Homeनगरस्व. जयंतराव ससाणे कोविड सेंटरचे लोकार्पण

स्व. जयंतराव ससाणे कोविड सेंटरचे लोकार्पण

श्रीरामपूर (प्रतिनिधी) – करोना विषाणूने जनता हतबल झालेली असून सर्वसामान्य जनतेचे हाल बघवत नाही. याच पार्श्‍वभूमीवर ज्या लोकांची रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत व ज्यांना घर लहान असल्याने विलगीकरणासाठी घरी जागा नाही अशा गरजू लोकांच्या समस्या लक्षात घेऊन उपनगराध्यक्ष करण ससाणे यांच्या मार्गदर्शनाखाली

श्रीरामपूर शहर काँग्रेस कमिटी, तुळजा फाउंडेशन, व्यापारी मर्चंट असोसिएशन, श्री शक्ती महिला ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने व्यापारी मंगल कार्यालय डावखर रोड या ठिकाणी 30 बेडचे स्व जयंतराव ससाणे कोविड आयसोलेशन सेंटर सुरु करण्यात आलेले आहे.

- Advertisement -

यामध्ये रुग्णांना मोफत जेवण, राहण्याची सोय,मोफत डॉक्टरांचा सल्ला देण्यात येणार आहे. करोना रुग्णांच्या सेवेसाठी एक सामाजिक जबाबदारी म्हणून काँग्रेस कार्यकर्त्यांच्या पुढाकाराने एकावेळेस तीस रुग्णांना मोफत उपचाराची सोय उपलब्ध होणार आहे. सदर सेंटरचा लोकार्पण सोहळा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, आ. सुधीर तांबे व आ. लहू कानडे यांच्या हस्ते पार पडला. या सर्व कार्यात माजी नगराध्यक्ष अनिल कांबळे, पक्षप्रतोद संजय फंड, जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष सचिन गुजर, शहराध्यक्ष संजय छल्लारे, मर्चंटचे अध्यक्ष विशाल फोफळे, जि. प. चे माजी सभापती बाबासाहेब दिघे, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष अरुण पाटील नाईक, ज्ञानेश्‍वर मुरकुटे, नगरसेवक मुजफ्फर शेख, दिलीप नागरे,

श्रीनिवास बिहाणी, रितेश रोटे, शशांक रासकर, मनोज लबडे, किरण परदेशी, रमण मुथा, दत्तात्रय सानप, मुन्ना पठाण, श्याम आढागळे, रमजान शहा, के. सी. शेळके, सतीश बोर्डे, पराग शहा, सौ.भारतीताई फंड, सौ. स्वातीताई छल्लारे, सौ. दिपालीताई ससाणे, युवक काँग्रेसचे सिद्धार्थ फंड, अभिजीत लिफ्टे, एनएसयुआयो अमोल शेटे, सनी मंडलिक, जावेद शेख, संतोष परदेसी, मिथुन शेळके, दिपक वमने, युवराज फंड, सिद्धार्थ सोनवणे, गोपाल लिंगायत, कृष्णा पुंड, सरबजीत सिंग चुग, राहुल बागुल, रितेश एडके, मनोज बागुल, राहुल शिंपी, अल्पसंख्यांक सेलचे दीपक कदम, सनी सानप,मर्चंट असोसिएशनचे उमेश अग्रवाल, निलेश ओझा, अमोल कोलते, विलास बोरावके, वैभव लोढा, सुनील गुप्ता, प्रवीण गुलाटी, संजय शहा, मुकेश कोठारी, प्रेमचंद कुंकूलोळ. यांनी मोठे सहकार्य केले. कोविड विलगीकरण सेंटरच्या या उपक्रमामुळे श्रीरामपूर शहरातील नागरिकांमधून या उपक्रमाचे कौतुक होत असून नागरिकांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना धन्यवाद दिले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या