Wednesday, November 20, 2024
Homeनाशिकनाशकात सोने ४१ हजारांवर; जाणून घ्या कधी होणार स्वस्त

नाशकात सोने ४१ हजारांवर; जाणून घ्या कधी होणार स्वस्त

नाशिक । पेट्रोलदरवाढ आणि बगदादमधील युद्धसदृश्य परिस्थितीचा परिणाम देशातील सर्वच बाजारावर स्पष्ट जाणवला. रविवारी (दि. 5) सोन्याचा दर जीएसटी व्यतिरिक्त 41 हजार रुपयांवर पोहोचला तर सोमवारी त्याच्यातील तेजी कायम राहून जीएसटीसहित 41 हजार 700 इतका राहिला.

अमेरिकेने बगदादवर केलेल्या हल्लानंतरही परिस्थिती युद्धसदृश झाली. साहजिकच पेट्रोलचे दर वाढून 81.62 रुपयांवर पोहोचेल. एकूणच परिस्थितीचा परिणाम देशातील महागाई वाढण्यास कारणीभूत ठरला. परिणामी शेअर बाजार तसेच सोने, चांदी बाजारवर जाणवला. शुद्ध सोन्याचा दर शुक्रवारी (दि.3) 38 हजार 800 रुपये प्रति दहा ग्रॅम होता तो रविवारी (दि. 5) 41 हजारांवर गेला. सोमवारी (दि.6) 40 हजार 490 3 टक्के जीएसटी अधिक सुमारे 41 हजार 700 इतका होता.

- Advertisement -

या वर्षी सर्वाधिक विवाह मुहूर्त आहेत. त्यामुळे सोने खरेदीसाठी बाजारपेठेत चैतन्य दिसले. मात्र सोन्याच्या वाढत्या किमतीमुळे ग्राहक वेट अ‍ॅण्ड वॉचच्या भूमिकेत आहे. तरीही यानंतर दर कमी होण्याची सुतराम शक्यता नसल्याचे जाणकार सांगत आहेत. ग्राहकांनी घाबरुन जाण्याचे कारण नाही, कारण सोने गुंतवणूक म्हणून खरेदी केले जाते. त्यामुळे सोन्याचे दर वाढले असले तरी ग्राहकांनी सोने खरेदी करून ठेवावी, कारण नजीकच्या भविष्यात आणखी भक्कम दरवाढ होण्याची शक्यता असल्याचे सराफ व्यापार्‍यांनी सांगितले.

गुंतवणूक म्हणून खरेदी
आमच्या पेढीत सोमवारी (दि.6) सोन्याचे दर प्रतितोळा 41 हजार 700 रुपये (3 टक्के जीएसटी अंतर्भूत) इतका होता. सोन्याचा भाव वाढला की आधी घेतलेल्या सोन्याला बाजारात आणून ग्राहक वाढीव दर ‘कॅश’ करतात. येत्या काळात सोन्याच्या भावात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
-शुभंकर टकले, संचालक टकले ज्युएलर्स

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या