Wednesday, May 8, 2024
Homeनगरनगर जिल्ह्याला झुकते माप देणार

नगर जिल्ह्याला झुकते माप देणार

कर्जत (प्रतिनिधी)– महाआघाडीला भरभरून यश दिल्याबद्दल आणि भाजपचा सुपडा साफ केल्याबद्दल कर्जत, जामखेड व नगर जिल्ह्यातील जनतेचे विशेष आभार मानतानाच, मी उपमुख्यमंत्री असेपर्यंत नगर जिल्ह्यााला झुकते माप देणार आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्जत तालुक्यातील माहिजळगाव येथे केले.

सृजन शासकीय योजना महाराजस्व आभियान शिबिराचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याहस्ते झाले. यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, आमदार रोहीत पवार, राजेंद्र पवार, आमदार सुधीर तांबे, आ. लहू कानडे, माजी आमदार राहुल जगताप, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा राजश्री घुले, जिल्हाअध्यक्ष राजेद्र फाळके यांच्यासह अनेकजण उपस्थित होते. यावेळी कर्जत तालुक्यातील शासनाच्या विविध विभागातील योजनांच्या पात्र लाभार्थीना लाभ वितरण कार्यक्रम मान्यवरांच्या हस्ते झाला.

- Advertisement -

माझ्यासह महाआघाडीच सर्व मंत्री आणि आमदार यांचे डोक्यात सत्तेची हवा जाणार नाही आम्ही जनतेसाठी काम करू कायम जमिनीवर राहू आणि शेतकरी महिलांसह सर्व घटकांसाठी काम करू तसेच राज्यामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये एनआरआयसी सह कोणताही कायदा लागु होणार नाही मुख्यमंत्री देखील या कायद्याच्या विरोधात आहेत, असे यावेळी अजितदादांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी महिलांच्या सुरक्षेबद्दल लवकरच कठोर कायदा करणार अशी माहिती दिली.

पेन्शन योजना अडचणीची
राज्यातील महाआघाडीचे सरकारने शेतकर्‍यांना कर्जमाफी दिली आहे. काही ंसंघटना नवीन पेन्शन लागु करावी अशी मागणी करीत आहेत. मात्र केंद्राने ही बंद केली आहे आणि सध्या 50 हजार कोटी जुनी पेन्शन वाटपासाठी लागत आहे. सरकारकडे पैसे नाहीत जर नवीन लागु केली तर 20 वर्षांनी येणारे सरकारला फक्त पगार आणि पेन्शन वाटप असे दोनच कामे राहतील, असेही सांगितले.

उजनीमध्ये बंधारे बांधणार
यावेळी कर्जत तालुक्यातील सिध्दटेक परिसरात भिमा नदीपात्रामध्ये बुडता बंधारा बांधणार आहे यामुळे उन्हाळयात शेतकर्‍यांना पाणी मिळेल असे पवार यांनी यावेळी जाहीर केले.

आ. रोहीत पवार म्हणाले की, कर्जत- जामखेड मधील कर्जत, माही व खर्डा या तिन गटातील नागरिकांचे सुमारे 42 हजार शासकीय कागदपत्रांचा प्रश्न सुटला आहे. कर्जतचा एसटी डेपो प्रश्न सुटला असून कर्जत आणि जामखेड येथिल बसस्थानक अद्यावत करणार आहोत याच प्रमाणे जामखेडला हक्काचे पाणी व एमआयडीसीसाठी पहिला सर्वे झाला असून दुसरा सर्वे होत आहे. यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे भाषण झाले. प्रस्ताविक अर्चना नष्टे यांनी केले.

सूर्य उगवला इकडे आणि ते गेले तिकडे.. विखेंवर टीका
शिर्डीमध्ये लढत ही अडचणीची होती. तिथे फार काही अपेक्षा नव्हती. जिकडे सूर्य उगवतो तिकडेच त्यांचा कल असतो. पण, यावेळी झालं वेगळंच त्यांना वाटलं सूर्य उगवेल तिकडे. पण, सुर्य उगवला इकडे आणि ते गेले तिकडे, असं म्हणत अजित पवार यांनी आपल्या शैलीत राधाकृष्ण विखे पाटील यांना टोला लगावताच उपस्थितांमध्ये हास्याची लकेर उमटली.

राम शिंदे यांच्यावर टीका
माजी मंत्री राम शिंदे यांच्यावरही अजित पवार यांनी जोरदार टीका केली. कायम कडक कपडे घालून नुसता गडी आखडून राहत होता. घरावर चार कोटी खर्च केला तो त्यांना विचारा. वास्तविक पहाता आपण ज्या परिस्थितीमधून आलो याचे भान प्रत्येक राजकीय नेत्याला असणे गरजेचे आहे, असेही पवार म्हणाले.

शेतकर्‍यांनो, वीज बिल भरायला शिका
महाविकास आघाडी सरकारने शेतकर्‍यांना कर्जमाफी देऊन मोठा दिलासा दिला आहे. आता आकडे टाकणे बंद करा आणि वीज बिल भरायला शिका, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकर्‍यांना केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या