Wednesday, November 13, 2024
Homeनगरबालिकाश्रम रस्त्याला पर्यायी रस्ता निर्माण करणार

बालिकाश्रम रस्त्याला पर्यायी रस्ता निर्माण करणार

महापौर वाकळे : सीना नदीवरील पुलाच्या कामांचा शुभारंभ

अहमदनगर (प्रतिनिधी) – पक्षीय राजकारण हे निवडणुकीपुरते असावे. निवडणूक संपल्यानंतर सर्वांनी आपसातील मतभेद विसरून सोबत राहून विकासकामे करावीत. शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून सर्व जण सोबत राहू. प्रभाग आठमध्ये चारही नगरसेवक शिवसेना पक्षाचे आहेत. तरीही आम्ही सर्व पक्षांचे नगरसेवक विकास कामांसाठी एक आहोत. या प्रभागात तीन कोटी रुपयांची विकासकामे मंजूर आहेत. माजी महापौर नगरसेवक अनिल बोरुडे हे नेहमीच विकासकामांसाठी प्रयत्नशील असतात. बालिकाश्रमरोडला पर्याय रस्ता म्हणून सीना नदी लगत रस्ता निर्माण करणार आहोत. या कामासाठी पाठपुरावा सुरू आहे. तरी नागरिकांनीही या कामासाठी सहकार्य करावे, असे प्रतिपादन महापौर बाबासाहेब वाकळे यांनी केले.

- Advertisement -

प्रभाग आठ मध्ये माजी उपमहापौर अनिल बोरुडे यांच्या प्रयत्नातून सीना नदीवरील पुलाच्या कामांचा शुभारंभ महापौर वाकळे यांच्या हस्ते झाला. यावेळी माजी उपमहापौर अनिल बोरुडे, नगरसेवक सचिन शिंदे, शाम नळकांडे, गणेश कवडे, माजी नगरसेवक दगडू मामा पवार, संजय शेंडगे, राहूल वाकळे, प्रदिप बोरुडे, नंदू बोरुडे, गोरख लक्ष्मण शिंदे, भैय्या रोहोकले, अक्षय बोरुडे, संजय बोरुडे, किशोर वाघ, शिवाजी बोरुडे, मारुती शिंदे, अभिजीत बोरुडे, जालिंदर बोरुडे, सोनू बोरुडे, बाबा मुळे, ज्ञानेश्वर बोरुडे, अनंत बोरुडे, काशिनाथ रोहोकले, अप्पा कदम, मुकुंद ताठे, शिवाजी कदम, शिरीष कानडे आदी उपस्थित होते.

यावेळी माजी उपमहापौर बोरुडे म्हणाले, प्रभाग आठ मधील सर्व भागामध्ये सुमारे 3 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. लवकरच ही कामे प्रभागामध्ये सुरू होणार आहे. प्रभागाचा कायापालट विकासकामांतून करणार आहोत. पावसाळ्यामध्ये पुरामुळे सीना नदीवरील पूल वाहून गेल्यामुळे बोल्हेगाव, नालेगाव व बोरुडेमळा शिवारात शेती कामासाठी जाण्यासाठी पुल पुन्हा नसल्यामुळे मोठी अडचण निर्माण झाली होती. मनपाच्या माध्यमातून हे काम आता सुरू झाले आहे. प्रभागाचा समतोल विकास हाच ध्यास आहे. प्रभागातील चारही नगरसेवक एका विचाराने काम करीत असल्यामुळे प्रभागामध्ये मोठ्या प्रमाणात विकास निधी मंजूर झाला आहे. आम्ही कधीही विकासकामाचे राजकारण आणत नाही असेही ते म्हणाले.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या