Sunday, May 5, 2024
Homeनगरपाच पॉझिटिव्ह अन् 69 निगेटिव्ह

पाच पॉझिटिव्ह अन् 69 निगेटिव्ह

राहाता, कोपरगाव अन् नगरमध्ये नव्याने रुग्ण : जिल्ह्याचा आकडा 212

अहमदनगर (प्रतिनिधी)– गेल्या काही दिवसांपासून नगर शहर आणि राहाता तालुक्यातील करोना बाधितांची साखळी तुटण्याचे नावे घेतांना दिसत नाही. रविवारी सकाळच्या सत्रात आलेल्या अहवालात राहाता तालुक्यात 3, नगर शहर आणि कोपरगाव तालुक्यात प्रत्येकी एक असे पाच नव्याने करोनाचे रुग्ण आढळले. यामुळे जिल्ह्याचा करोना बाधितांचा आकडा आता 212 पर्यंत वाढला आहे. दरम्यान, काल सकाळच्या सत्रात 29 आणि सायंकाळच्या सत्रात 40 व्यक्तींचे करोनाचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

- Advertisement -

जिल्हा रुग्णालयातील करोना चाचणी प्रयोग शाळेतून 34 व्यक्तींचा काल सकाळी अहवाल प्राप्त झाले होते. यात नव्याने पाच रुग्ण तर 29 व्यक्तींचा करोनाचा अहवाल निगेटिव्ह आले होते. त्यानंतर दिवसभरात 56 अहवाल वेटींग असल्याचे जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून सांगण्यात आले. पॉझिटिव्ह आलेल्यामध्ये राहाता तालुक्यातील निघोज निमगाव येथील 50 वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले.

यासह प्रवरानगर येथील 34 वर्षीय महिला आणि अकरा वर्षाच्या मुलगा हा करोना पॉझिटिव्ह सापडला. नगर शहरातील पाचपीर चावडी येथील 48 वर्षीय व्यक्तीला कोरोनची लागण झाली असून तो आधीच्या बाधित व्यक्तीच्या संपर्कात आला होता. यासह कोपरगाव तालुक्यातील धोत्रे येथील 14 वर्षीय मुलीला कोरोनाची बाधा झालेली आहे. या पाच नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यात करोना बाधितांचा आकडा 212 झाला आहे.

अ‍ॅक्टिव्ह केसेस 80
जिल्ह्यात सध्या 80 अ‍ॅक्टिव्ह केसेस आहेत. आतापर्यंत करोना संशयीत व्यक्तीचे 2 हजार 994 स्त्राव तपासणी करण्यात आली आहे. यात 2 हजार 684 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर रविवारी रात्री 12 अहवाल येणे बाकी होते. जिल्ह्यात आतापर्यंत महानगरपालिका क्षेत्र 47, उर्वरित जिल्हा 108, इतर राज्य 2, इतर देश 8 आणि इतर जिल्हा 47 असे 212 बाधित रुग्ण आढळले आहेत.

आणखी 12 रुग्णांची करोनावर मात
जिल्ह्यातील 12 व्यक्तींनी रविवारी करोनावर मात केली. यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत 121 कोरोनाग्रस्त बरे होऊन परतले घरी केले आहेत. रविवारी कोरोनामुक्त झालेल्यामध्ये नगर शहरातील 5, संगमनेर येथील 2 राशीन (कर्जत) येथील 2 नेवासा, राहाता आणि अकोले येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश असल्याचे जिल्हा रुग्णालयाकडून सांगण्यात आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या