Thursday, May 2, 2024
Homeनगरकरोना विरोधात गुजरातच्या ग्रॉउंडवर पारनेरच्या सुपत्राचा झेंडा !

करोना विरोधात गुजरातच्या ग्रॉउंडवर पारनेरच्या सुपत्राचा झेंडा !

-ज्ञानेश दुधाडे

डीसीपी प्रशांत सुंबे यांच्या नेत्रदिपक कामगिरीने सुरतमध्ये कोरोनाला रोखले

- Advertisement -

अहमदनगर – सुरत शहरातील झोन चारमध्ये सुरूवातीच्या टप्प्यात करोनाचे रूग्ण सापडले. मात्र, यामुळे विचलित न होता, योग्य नियोजन आणि जनतेला विश्वासात घेवून त्यानंतरच्या काळात कडेकोट लॉकडाऊन राबवून गुजरातच्या ग्राऊंडवर पारनेरच्या सुपूत्राने आपला झेंडाच रोवला. पोलीस उपायुक्त प्रशांत सुंबे यांच्या योग्य नियोजनामुळे हे शक्य झाले. डीसीपी सुंबे यांच्या चमकदार कामगिरीमुळे नगर जिल्ह्याची नव्हे, तर पारनेर तालुक्याची मान आणि शान दोन्ही उंचवाली आहे.

पारनेर तालुक्यातील पाडळी गोरेगाव येथील आयपीएस अधिकारी प्रशांत सुंबे गेल्या सात महिन्यांपासून गुजरात राज्यातील सुरत या महत्वाच्या शहरात वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त म्हणून कार्यरत आहेत. सध्या महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यात करोना प्रकोप वाढत आहे. अशा परिस्थितीत आरोग्य विभागाशी खांद्याला खांदा लावून काम करण्याची जबाबदारी पोलीस यंत्रणेवर आली आहे.

यामुळे देशातील सर्वच शहरात लॉकडाऊनच्या काळात पोलीस अधिकारी व कर्मचारी अहोरात्र काम करतांना दिसत आहे. कोणत्याही परिस्थितीत जनता घराबाहेर पडू नये, यासह कायदा आणि सुव्यवस्थेचा राखण्यासोबतच अडचणीत असणार्‍यांना मदत करण्यासोबत उपाशी असणार्‍यांच्या पोटाला दोन वेळचे अन्न देण्याची जबाबदारी पारपडत आहे.

अशीच चमकदार कामगिरी पाडळीचे तरूण आयपीएस अधिकारी सुंबे हे गुजराथ राज्यातील सुरत शहरात करत आहेत. सुरत शहरात एकूण चार झोन असून त्यांच्या खांद्यावर संपूर्ण शहराच्या वाहतूक नियंत्रणासोबत झोन क्रमांक चारची स्वतंत्र जबाबदारी आहे. सुरत शहरात ज्यावेळी करोनाचे रुग्ण आढळण्यास सुरूवात झाली. त्यावेळी पहिल्या 10 रुग्णांमध्ये सुंबे यांच्या हद्दीतील झोनमधील 6 रुग्णांचा त्यात समावेश होता.

सुरत शहरात सर्वप्रथम लोकडाऊनच्या काळात जनतेला घराबाहेर पडून न देण्यासाठी त्यांनी ड्रोनचा वापर केला. तसेच जनतेला पोलिसांचे कान आणि डोळे बनवत गर्दीची ठिकाणे, विनाकारण घराबाहेर फिरणार्‍यांची माहिती जनतेकडून मागविली. याचा फायदा असा झाली की त्यांच्याकडे पाच हजारांहून फोटो आणि व्हिडीओ आले. त्याचा आधार घेत सुंबे यांनी नागरिकांना घरात लॉकडाऊन करण्यात यश मिळविले.

सोशल मीडियातील फेसबुक, ट्विटर. या दोन्हीच्या माध्यमातून त्यांनी मोठ्या प्रमाणात सुरतच्या जनतेशी संवाद साधून त्यांना घरात राहण्याचे आवाहन केले आणि जनतेने त्यांना मोठा प्रतिसाद दिला. यामुळे नगर जिल्ह्यातील या मराठी अधिकार्‍यांने आपल्या गुणवत्ता आणि बुध्दीच्या जोरावर सुरत शहरात गुजराथ राज्यातील पोलीस प्रशासनात आपला वेगळा ठसा उमटविला आहे.

मदतीसाठी सदैव तत्पर
काही दिवसांपूर्वी पारेनर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर एका व्यक्तींचा सुरत शहरात निधन झाले. त्या व्यक्तीचे सुरतमध्ये कोणीच नव्हते. ही माहिती उपायुक्त सुंबे यांना मिळताच त्यांनी संबधीतांचे शवविच्छेदनासह अन्य प्रक्रिया पूर्ण करून शववाहिकेव्दारे मृताचे पाथीव गावी पाठवून दिले. तसेच कोणालाही सुरतमध्ये काही अडचण आल्यास संपर्क करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

2015 चे आयपीएस
सुंबे हे यांचे शालेय शिक्षण हे पारनेर तालुक्यात झाले त्यानंतर 12 नंतर पुण्यात त्यांनी इंजिनिअयरींग पूर्ण केल्यावर स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करत 2015 मध्ये आयपीएस झाले. यापूर्वी द्वारका आणि अन्य ठिकाणी काम केल्यानंतर सात महिन्यांपूर्वी सुरत शहरात त्यांची पोलीस उपायुक्त पदावर नेमणूक झालेली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या