Monday, May 6, 2024
Homeनगरकोरोना संकटात संगमनेरच्या डॉ. जयश्री थोरात टाटा रुग्णालयाच्या रुग्णसेवेत

कोरोना संकटात संगमनेरच्या डॉ. जयश्री थोरात टाटा रुग्णालयाच्या रुग्णसेवेत

संगमनेर (प्रतिनिधी) – कोरोनाच्या भयंकर संकटात मुलगा अमेरिकेत आणि मुलगी टाटा हॉस्पिटच्या कॅन्सर वॉर्डमध्ये काम करते. अशा परिस्थितीत महाराष्ट्राचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात राज्याच्या जनतेला दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत.

संपूर्ण जगात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. भारतातही कोरोनाचे पेशंट थोड्या प्रमाणात का होईना वाढत आहेत. महाराष्ट्रात तीच परिस्थिती आहे. विशेषत: मुंबई-पुणे येथील धोका वाढलेला आहे. मुंबईत अनेक ठिकाणी हॉटस्पॉट जाहीर झालेले आहेत. आणि मुंबई हे देशाचे महत्त्वाचे केंद्र असल्याने याठिकाणी आरोग्य चांगले असणे गरजेचे आहे. मात्र मुंबईत थोडा थोडा आकडा वाढत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात सर्व मंत्रिमंडळ, सरकार, वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय सेवक, कर्मचारी, पोलीस, प्रशासन सर्व जण कोरोना वर मात करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत. अशा परिस्थितीत राज्यातले खासगी डॉक्टर सुद्धा सरकारच्या मदतीला धावून आले आहेत.

- Advertisement -

काही ठिकाणी परिस्थिती वेगळी आहे. खाजगी डॉक्टरांनी ओपीडी बंद ठेवले आहेत किंवा ते पेशंट तपासण्यास घाबरत आहेत. संगमनेरमध्ये ही अवस्था आहे.
महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांची कन्या डॉ. जयश्री ही मुंबईमध्ये टाटा हॉस्पिटलमध्ये काम करत आहे. याठिकाणी कॅन्सरचे पेशंट असतात. या पेशंटची रोगप्रतिकारक क्षमता अत्यंत कमी झालेली असते. अशा ठिकाणी साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची खूप शक्यता असते, धोका असतो तेथे डॉ. थोरात आरोग्य सेवा देण्याचे काम करीत आहेत. टाटा रुग्णालयात आजारातून बरे झालेले रुग्ण फॉलोअपसाठी येत असतात. मात्र कोरोना महामारीचे संकट सुरू झाल्यापासून गर्दी होऊ नये म्हणून या रुग्णांना घरीच थांबा असे सांगण्यात आले असून त्यांना तीन महिने पुढच्या अपॉइंटमेंट दिल्या आहेत. इमर्जन्सीसाठी संपर्क नंबर दिलेले असून त्यावरून त्यांना आवश्यक त्या गोळ्या-औषधे संदर्भात सूचना केली जाते.

डॉ. जयश्री थोरात यांनी सांगितले की, हॉस्पिटलमध्ये ब्लड कॅन्सर विभागात काम करत असल्यामुळे विशेष काळजी घ्यावी लागते. कॅन्सरच्या रुग्णाची रोगप्रतिकारक शक्ती कमी झालेली असते. विशेषत: ब्लड कॅन्सरच्या रुग्णांची तर अतिशय खालावलेली असते.त्यातच हा संसर्ग रक्ताशी निगडित आहे. रक्तातील ऑक्सिजनशी निगडीत आहे. त्यामुळे अधिक खबरदारी हॉस्पिटलकडून घेतली जाते. टाटाचे काम कधीच थांबत नाही. काम वेळेवर चालू असते. त्याचप्रमाणे सगळेच डॉक्टर एकाच वेळी उपस्थित राहू नयेत म्हणून खबरदारी घेत रोटेशन पद्धतीने आम्हाला सध्या ड्युटी सुरू आहे.

आयसोलेशन वॉर्ड तयार केलेले आहेत. त्यामध्ये आयसीयू तर आहेच पण फिवर ओपीडी सुद्धा सुरू केली आहे. संपूर्ण काळजी घेऊन पेशंट तपासले जातात. आम्ही सुद्धा सर्व प्रकारची काळजी घेत काम करत आहोत. आमच्याबरोबर सिनिअर डॉक्टर्स, नर्स, वॉर्डबॉय सर्वच वैद्यकीय कर्मचारी कॅन्सर आणि कोरोना दोघांशी लढा देत आहेत.

देश आज कोरोनाने ग्रासलेला असताना टाटा रुग्णालय कुठेच कमी पडणार नाही. असा विश्वास डॉ. जयश्री थोरात यांनी व्यक्त केला. तर दुसरीकडे बाळासाहेब थोरात यांचा मुलगा राजवर्धन थोरात हा अमेरिकेत शिक्षण घेत असल्याने कोरोना सुरू झाल्यापासून अमेरिकेतच अडकला आहे. थोरातांनी ठरवले असते तर राजकीय पदाचा वापर करीत सुरूवातीलाच मुलाला अमेरिकेतून आणले असते मात्र तसं न करता मुलाला तेथेच राहण्यास सांगून काळजी घेण्यास सांगितले आहे. समाजसेवेचा वारसा असलेल्या थोरात कुटुंबियांचा सर्व संगमनेर करांना अभिमान वाटतो आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या