Friday, May 3, 2024
Homeनगरगुटखा दिला नाही म्हणून दुकानदारावर चाकूहल्ला

गुटखा दिला नाही म्हणून दुकानदारावर चाकूहल्ला

मिटविण्यासाठी आलेला तरुण जखमी ; जोगेश्वरी आखाडा येथील घटना

राहुरी (प्रतिनिधी)- राहुरी शहरातील जोगेश्वरी आखाडा येथे गुटखा दिला नाही म्हणून चार ते पाच अज्ञात तरुणांच्या टोळक्याने दुकानदारावर चाकूने हल्ला केला. ही घटना काल सोमवार दि.4 मे रोजी सकाळी 12 वाजेच्या दरम्यान घडली. मात्र, सुदैवाने या दुकानदाराने प्रसंगावधान राखत आपला जीव वाचविला. हा वाद मिटविण्यासाठी तेथीलच दत्तात्रय धनवटे हा तरुण गेला असता त्याच्या हातावर सत्तूर लागल्याने तो जखमी झाला आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिक भयभीत झाले असून यावेळी नागरिकांची पळापळ झाली.

- Advertisement -

या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक राहुल सानप, चालक पोलीस हवालदार पथवे, उत्तरेश्वर मोरळे यांनी घटनास्थळी जाऊन हल्ला करणार्‍या दोन तरुणांसह दोन मोटारसायकल, एक धारदार हत्यार पोलिसांनी तत्काळ ताब्यात घेतले. मात्र दोघे पसार झाले आहेत. काल राहुरी पोलीस ठाण्यात दुपारी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

एकीकडे करोना व्हायरसने संपूर्ण देशात थैमान घातले असताना करोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी प्रशासन जिवाचे रान करीत आहे. मात्र, अशा परिस्थितीत राहुरी तालुक्यासह शहरात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे तसेच हाणामार्‍याच्या घटना सुरू असल्याने तालुक्यात पोलिसांच्या अकार्यक्षमतेमुळे पुन्हा गुन्हेगारीने डोके वर काढले असल्याची नाराजी नागरिकांनी व्यक्त केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या