Friday, May 3, 2024
HomeUncategorizedठरलं ! धाक’ या नावाने हिंदीमध्ये बनणार ‘मुळशी पॅटर्न’चा रीमेक

ठरलं ! धाक’ या नावाने हिंदीमध्ये बनणार ‘मुळशी पॅटर्न’चा रीमेक

मुंबई : दिग्दर्शक प्रवीण तरडे यांचा ‘मुळशी पॅटर्न’ २०१८ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला तुफान प्रतिसाद मिळत हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. लवकरच या सिनेमाचा हिंदी रिमेक येत असून यामध्ये सलमान खान आणि आयुष शर्मा मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

दरम्यान मुळशी पॅटर्न रिलीज झाल्यानंतर अल्पावधीत प्रसिद्धीस आला होता. त्याचवेळी सलमान हा चित्रपट बनवणार असल्याची बातमी आली होती, आता या हिंदी चित्रपटाचे नावदेखील निश्चित करण्यात आले आहे. हिंदी रिमेक असलेल्या या चित्रपटाचे नाव ‘धाक’ असणार आहे.

- Advertisement -

या चित्रपटात सलमान खान पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे, तर आयुष शर्मा या चित्रपटाच्या गँगस्टरच्या भूमिकेत दिसणार आहे. मुख्य म्हणजे लॉकडाऊनमध्ये आपापल्या घरी या चित्रपटाचे काम सुरु झाले आहे.

दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी या मराठी चित्रपटाचे खास स्क्रीनिंग सलमान खान आणि अरबाझ खान यांच्यासाठी ठेवले होते. त्यानंतर सलमान खानने हा चित्रपट करण्यास होकार दिला. फरहाद सामजी या चित्रपटाचे दिग्दर्शक असून पूजा हेगडे सलमान खानच्या सोबत दिसणार आहे. सध्या या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख १३ मे २०२१ ठरवण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या