Thursday, May 2, 2024
Homeनगरपाथर्डी तालुक्यात खाजगी डाॅक्टरांचे दवाखाने बंद : रुग्णांचे हाल

पाथर्डी तालुक्यात खाजगी डाॅक्टरांचे दवाखाने बंद : रुग्णांचे हाल

खरवंडी कासार (वार्ताहर)- पाथर्डी तालुक्यात खाजगी दवाखाने डॉक्टरांच्या आडमुठेपणाच्या भूमिकेमुळे बंद आहेत. जगात कोरोना विषाणुने थैमान घातले असताना भारतातही मोठ्या प्रमाणावर शिरकाव झाला आहे. पाथर्डी तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालय व काही निवडक खाजगी दवाखाने वगळता बहुतांश खाजगी दवाखाने डाॅक्टरांच्या आडमुठेपणाच्या भूमिकेमुळे बंद असल्याचे दिसुन येत आहे.

महाराष्ट्र राज्य सरकारने खाजगी डाॅक्टरांची दवाखाने बंद असल्यास परवाने रद्द करुन कारवाई करण्याचे आदेश दिलेले असताना पाथर्डी तालुक्यातील खाजगी कारखान्यांच्या डाॅक्टरांनी या सुचनेकडे साफ दुर्लक्ष केले आहे यामुळे पाथर्डी तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालय तिसगाव खरवंडी कासार मेरी करंजी इत्यादी ठिकाणीची प्राथमिक आरोग्य केंन्द व काही निवडक खाजगी दवाखाने वगळता इतर खाजगी डाॅक्टरांचे दवाखाने बंद असल्याने पाथर्डी तालुक्यातील रुग्णांचे उपचाराअभावी हाल होत असल्याचे चित्र आहे.

- Advertisement -

जिल्हाधिकारी यांनी तातडीने पाथर्डी तालुक्यातील आरोग्यसेवेची होत असलेली हेळसांड लक्षात घेत उपलब्ध आरोग्ययंञणा व खाजगी डाॅक्टरांचे दवाखाने त्वरीत सुरु करण्याचे आदेश द्यावेत.

-शैलेंद्र जायभाये, माहीती अधिकार महासंघ, पाथर्डी

पाथर्डी तालुक्यातील निवडक खाजगी दवाखाने सुरु आहेत. परंतु बहुतांश खाजगी दवाखाने सुरु करण्याकरता सरकारकडे स्वंयरक्षक किट एम ९५ मास्क व इतर आवश्यक वैद्यकीय सामग्रीची मागणी केली आहे. तसेच खाजगी दवाखान्यातील कर्मचारी कोरोणाच्या दहशतीमुळे कामावर येत नाहीत. अशा परिस्थितीत सरकारच्या आदेशानुसार पाथर्डी तालुक्यातील सर्व खाजगी डाॅक्टरांनी दवाखाने सुरु ठेवुन रुग्णांना वैद्यकीय सेवा द्यावी.

– डाॅ विनोद गर्ज साई बालरुग्नालय पाथर्डी

- Advertisment -

ताज्या बातम्या