Friday, November 15, 2024
Homeनगरकोंभाळणेसह अकोले तालुक्यात जल्लोष

कोंभाळणेसह अकोले तालुक्यात जल्लोष

अकोले (प्रतिनिधी) – महाराष्ट्र केसरी स्पर्धेत विजेते पद पटकविलेले अकोले तालुक्यातील कोंभाळणे गावचे सुपुत्र हर्षवर्धन मुकेश सदगीर याने महाराष्ट्र केसरी 2020 हा मानाचा किताब मिळविल्याची माहिती कळताच अकोले तालुक्यासह त्याचे मूळगाव असणार्‍या कोंभाळणे गावात एकच जल्लोष साजरा करण्यात आला.

अकोले तालुक्यातील रयत शिक्षण संस्थेच्या अंबिका विद्यालय टाहाकारी येथील विद्यालयात लॅब असिस्टंट म्हणून कार्यरत असणार्‍या मुकेश सदगीर यांचा हर्षवर्धन हा मुलगा आहे. पुणे येथील बालेवाडी स्टेडियममध्ये काल झालेल्या महाराष्ट्र केसरी 2020 स्पर्धेत अंतिम सामन्यात विजयी होऊन महाराष्ट्र केसरी हा किताब अकोले तालुक्याला मिळवून देऊन अकोले तालुक्यात मानाचा तुरा खोवला आहे. हर्षवर्धनची कौटुंबिक परिस्थिती जेमतेम असून त्याची आई ठकूबाई सदगीर या गृहिणी आहेत तर भाऊ जगन सदगीर हा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षेची तयारी करीत आहे.

- Advertisement -

काल सोमवारी उपांत्यपूर्व फेरीत हर्षवर्धनने गतविजेता अभिषेक कटके याचा पराभव करून अंतिम सामन्यात प्रवेश केल्यावर कोंभाळणे गावातील उपसरपंच गोविंद सदगीरसह त्याचे काका राजेंद्र सदगीर, आजोबा कोंडाजी ढोन्नर, किसन सदगीर ,ग्रा. प.ं सदस्य आनंदा सदगीर, मधुकर बिन्नर, बाळासाहेब सदगीर, संतोष सदगीर, महेश सदगीर, सीताराम बेनके, यांचे सह ग्रामस्थ अंतिम सामना पाहण्यासाठी बालेवाडी स्टेडियम येथे गेले होते.कोंभाळणे येथील तरुण व ज्येष्ठ ग्रामस्थ यांनी हर्षवर्धनने अंतिम सामन्यात विजय मिळवताच गावात फटाक्यांची आतषबाजी करून एकच जल्लोष साजरा केला.

दरम्यान ‘हर्षवर्धनला महाराष्ट्र केसरी होण्याची पहिल्यापासून इच्छा होती. यासाठी त्याने अतोनात परिश्रम घेतले. गावचा व समाजाचा सन्मान त्याने वाढविला आहे’, अशी प्रतिक्रिया कोंभाळणेचे उपसरपंच गोविंद सदगीर यांनी दिली.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या