Wednesday, December 4, 2024
HomeनाशिकNashik Political: निफाडच्या विकासासाठी बनकरांना पुन्हा विधानसभेत पाठवा

Nashik Political: निफाडच्या विकासासाठी बनकरांना पुन्हा विधानसभेत पाठवा

पिंपळगावच्या विराट जनसमुदाय सभेत उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांचे आवाहन

पालखेड मिरचिचे

गेल्या पाच वर्षांच्या कार्यकाळात सर्वांधिक निधी उपलब्ध करून तालुक्यात गेल्या अनेक वर्षात न होणारी विकास कामे आमदार दिलीपराव बनकरांनी पुर्ण केली असल्याने हे ’विकासपर्व असेच सुरू ठेवण्यासाठी महायुतीचे उमेदवार म्हणुन दिलीपराव बनकरांना पुन्हा विधानसभेत पाठवा असे अवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांनी केले. ते महायुतीचे अधिकृत उमेदराव दिलीपराव बनकर यांच्या प्रचारार्थ आयोजित पिपंळगाव बसवंत येथे विराट जनसमुदायाच्या सभेत बोलत होते .

- Advertisement -

याप्रसंगी व्यासपिठावर महायुतीचे सर्वच पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थितीत होते ङ्गगेल्या पाच वर्षात निफाड तालुक्यात जवळपास 1600 कोटीची कधीही न होऊ शकणारी विकासकामे साकारली आहे निवडणुक काळात जनतेला दिलेल्या अश्वासनांची पुर्तता करण्यासाठी सत्ता महत्वाची असते यासाठी सत्तेत सहभागी व्हावे लागले यापुढील काळात महायुतीच्या माध्यमातुन निफाड तालुक्यासाठी 3000 हजार कोटीचा निधी उपलब्ध करून देतो, निफाड सहकारी साखर कारखाना कडलग व गोडसे हे व्यवस्थितीत चालवणार असतील तर महायुतीच्या माध्यमातुन त्यांना सर्वांतोपरी सहकार्य करू अन्यथा त्यांच्याकडुन परत घेऊन तो कसा चालु करता येईल यासाठी प्रयत्न केले जातील,शेतकर्यांची अर्थवाहिनी म्हणुन ओळखल्या जाणारी जिल्हा बँकेसाठी कठोर निर्णय घेऊन ती पुन्हा पुर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्न केले जातील शेतीला यापुढे दिवसा विजेचा पुरवठा करण्यात येईल शेतकर्यांनी मागचे व या पुढील पाच वर्षात लाईटबिल भरायचे नाही.

लाडक्या बहिणीसाठी सुरू केलीली योजना यापुढेही अशीच सुरू राहणार असुन तिची रक्कम वाढविण्यात आली आहे निफाड तालुका कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करण्यासाठी महत्वकांक्षी प्रकल्प राबविण्यात येतील महायुतीचे उमेदवार म्हणुन दिलीपराव बनकरांबरोबरच यतिनभाऊ कदम,बाळासाहेब क्षिरसागर हेदेखील मोठ्या प्रमाणात इच्छुक होते त्यांनाही भविष्यात मोठी संधी दिली जाईल असा शब्द ना.अजितदादा पवारांनी यावेळी दिला महायुतीच्या सर्वच घटकांनी मला साथ द्या व केंद्राप्रमाणेच राज्यात देखील महायुतीची सत्ता अशीच सुरू ठेवण्यासाठी माझा सहकारी म्हणुन दिलीपराव बनकरांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहुन त्यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याची विनंती यावेळी अजितदादा पवारांनी केली तालुक्यात कधीही न होणारी विकासकामे साकारली असल्याने होत असलेली विधानसभेची निवडणुक हि फक्त विकासकामांच्या मुद्यावरच होणार असल्याने केलेला विकास निफाड तालुक्यातील जनतेसमोर आहे निवडणुक काळात निफाडच्या जनतेला दिलेल्या अश्वासनांची पुर्तता करण्यासाठी सत्तेत सहभागी झाल्याशिवाय पर्याय नव्हता सत्तेत सहभागी झाल्यामुळेच आज तालुक्यातील प्रमुख रस्त्यांसह शिवार रस्त्यांची कामे पुर्ण करू शकलो.

नांदुरमध्येश्वर धरणाच्या वाढिव गेटचे काम असो अथवा सायखेडा येथील गोदावरी नदीवरील पुल यासारखी कधीही न होणारी विकासकामे तालुक्यातील जनतेसमोर आहे त्यामुळे हि निवडणुक आपण फक्त विकासकामांच्या मुद्यावरच आपण लढत आहे गेल्या पाच वर्षात झालेली विकासकामे तुमच्यासमोर असल्याने तुमचा’जनसेवक’म्हणुन मला पुन्हा तुमची सेवा करण्याची संधी द्यावी अशी विनंती महायुतीचे उमेदवार आमदार दिलीप बनकरांनी यावेळी केली केंद्र व राज्य सरकारच्या पाठपुराव्यामुळेच आज कांद्याला बाजारभाव आहे तो यापुढेही असाच राहिला पाहिजे यासाठी केंद्रप्रमाणेच राज्यात देखील एक विचाराचे सरकार असणे गरजेचे आहे मागील निवडणुकीत अजितदादांनी दिलेले शब्द पुर्ण करण्यासाठी गेल्या पाच वर्षात मी प्रमाणिक प्रयत्न केला आहे.

लाडकी बहिण, शेतकर्यांना विजबिलात सवलत यासारख्या अनेक कल्याणकारी योजना कायमस्वरूपी सुरूच राहणार असल्याने राज्यासह निफाड तालुक्यातील जनता महायुतीच्या कामकाजावर समाधानी आहे यावेळी अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले तालुक्यातुन हजारो महिला भगिनींसह ,युवती ,शेतकरी व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थितीत होते ङ्गङ्गचौकट 1)ङ्गमहायुतीकडुन इच्छुक असलेले उमेदवार म्हणुन यतिनभाऊ कदमांनी पक्षाशी एकनिष्ठा ठेवत महायुतीचे उमेदवार म्हणुन दिलीपकाका बनकरांना आपला पाठिंबा दर्शवत आपली भुमिका स्पष्ट केली भविष्यात यतिन कदम आमदार कधीही होऊ शकतो पण ना.अजितदादा पवारांचा आमदार म्हणुन दिलीपकाका बनकरच हे निफाड तालुक्यातुन झाल्याशिवाय राहणार नाही अशी खात्री यतिनभाऊ कदमांनी व्यक्त केली.महायुतीचा धर्म पाळत भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा यात सिंहाचा वाटा राहिल अशी ग्वाही यावेळी यतिनभाऊ कदमांनी दिली .

गेल्या पाच वर्षाच्या कालखंडात दिलीपकाकांच्या माध्यमातुन निफाड तालुक्यात कोट्यावधी रूपयाची कधीही न होऊ शकलेली विकासकामे साकारली आहे महायुतीने राबवलेल्या योजनांच्या माध्यमातुन व केलेल्या विकासकामांची पावती म्हणुन दिलीपकाका बनकर मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असा आत्मविश्वास मविप्रचे सभापती बाळासाहेब क्षिरसागर यांनी यावेळी व्यक्त केला

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या