Wednesday, November 6, 2024
Homeनगरनगरमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला

नगरमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला

जिल्हा रुग्णालयात उपचार; नगरकर आणखी सतर्क

अहमदनगर (प्रतिनिधी)- जगात धुमाकूळ घालणार्‍या कोरोनाचे रुग्ण महाराष्ट्रात मुंबई, नागपूर, पुणे, औरंगाबाद येथे आढळले असतानाच या कोरोनाने आता नगरमध्ये धडक मारली आहे. नगर शहरात दुबई येथे जाऊन आलेला कोरोनाचा एक रूग्ण आढळून आला आहे. सदर रुग्ण सामान्य रुग्णालय येथे विलगीकरण कक्षात दाखल आहे. त्याची प्रकृती स्थिर व चांगली असल्याचे माहिती जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. दरम्यान प्रशासनाबरोबरच नागरिकही सतर्क झाले आसून जो तो आपापल्या परीने खबरदारी घेत आहे.

- Advertisement -

या रुग्णामध्ये अद्याप सर्दी, ताप, खोकला इत्यादी सारखे लक्षणे आढळून आली नाहीत. तरीही रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांची माहिती घेऊन त्यांच्यावर बारीक लक्ष ठेवण्यात येत आहे. तथापि नागरकांनी घाबरू नये असे आवाहन त्यांनी केले आहे. सध्या गावोगाव भरणार्‍या यात्रा आणि उरुसाच्या पार्श्वभूमीवर गर्दीची ठिकाणे टाळण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. नागरिकांनी वेेळोवेळी दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे असे स्पष्ट करण्यात आले आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या