Monday, May 6, 2024
Homeनाशिकसिन्नर : पाथरे येथील ७४ वर्षीय पुरुषास करोनाची बाधा

सिन्नर : पाथरे येथील ७४ वर्षीय पुरुषास करोनाची बाधा

पाथरे : तालुक्यातील पाथरे खुर्द येथील ७४ वर्षांच्या वृद्धाचा करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. तालुक्यातील पहिले दोन रुग्ण गावातीलच असल्याने व त्यानंतर पुन्हा एक अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

मूत्र मार्गाचा विकार असणारी सदर व्यक्ती गेल्या आठवड्यात कोपरगाव येथील खाजगी रुग्णालयात दाखल उपचारासाठी दाखल झाली होती.

- Advertisement -

यादरम्यान छोटीशी शस्त्रक्रिया करावी लागणार असल्याने दि. ८ रोजी कोविड तपासणीसाठी सदर रुग्णाचे स्वब चे नमुने घेण्यात आले होते. खाजगी लॅबकडून याबाबतचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

याबाबत जिल्हा प्रशासनास कळवण्यात आल्यावर सदर व्यक्ती राहत असलेल्या ठिकाणी वावी प्राथमिक आरोग्य केंद्राकडून पथक पाठवण्यात आले. ही व्यक्ती राहत असलेल्या ठिकाणचा १०० मीटर परिसर पुढील १४ दिवसांसाठी कॅटेंटमेंट एरिया म्हणून निश्चित करण्यात आला आहे. दुपारनंतर तहसीलदार राहुल कोताडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोहन बच्छाव, सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांनी पाथरे खुर्द गावाला भेट देऊन पाहणी केली. ग्रामस्थांनी कोणतीही भीती बाळगू नये. आरोग्य पथकाने तापसणीसाठी सहकार्य करावे असे आवाहन तहसीलदारांनी केले आहे.

दरम्यान, सदर रुग्णाच्या हायरिस्क संपर्कातील ४ जणांना सिन्नर येथील कोविड रुग्णालयात नेण्यात आले असून लो रिस्क संपर्कातील १६ जणांना होम क्वॉरेन्टाईन करण्यात आले आहे.

वैद्यकीय अधिकारी डॉ. अजिंक्य वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाचे पथक उद्यापासून सर्वेक्षणाचे काम हाती घेणार आहे. गावात आज तिसरा पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्यानंतर पाथरे खुर्द, बुद्रुक व वारेगाव मध्ये भीतीचे वातावरण आहे.

पहिल्या वेळी रुग्ण आढळल्यावर तिन्ही गावे दोन आठवडे बंद ठेवण्यात आली होती. मात्र नंतर कंटेंटमेंट एरियाबाबत शासनाने सुधारणा केल्याने आता केवळ रुग्णाचे वास्तव्य असणारा परिसर प्रतिबंधित असणार आहे. या रुग्णाच्या हायरिस्क संपर्कातील चार जणांचे अहवाल येयीपर्यंत सर्वांच्या मनात भीती असणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या