Monday, July 15, 2024
Homeनाशिकइंदिरानगर : पाथर्डी फाट्याजवळ एसटी बस वाहकाला मारहाण

इंदिरानगर : पाथर्डी फाट्याजवळ एसटी बस वाहकाला मारहाण

इंदिरानगर : एसटी बसच्या वाहकाला शिवीगाळ तसेच मारहाण केल्याची घटना पाथर्डी फाटाजवळ घडली. गुरुवारी (दि.१९) सायंकाळी साडेसहा वाजेच्या दरम्यान प्रकार घडला.

- Advertisement -

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवार (दि. १९) रोजी एसटी महामंडळाची नाशिक-कसारा बस नाशिक येथून निघून सायंकाळी साडेसहा वाजेच्या दरम्यान पाथर्डी फाटा येथे थांबली. यावेळी चार अनोळखी इसम बसमध्ये आले, त्यांनी वाहकाला वीटीसी फाटा या ठिकाणी जावयाचे आहे असे सांगितले. यावर वाहक कमलाकार गांगोडे यांनी बस थेट कसारा असल्याने मधल्या थांब्यावर बस थांबणार नसल्याचे सांगितले. या चार जणांपैकी एकाने धक्कबुक्की करीत शिवीगाळ केली.

यावेळी बसचालकाने बस शेजारील शहर वाहतूक पोलीस ठाण्यात नेली. येथील पोलीस कर्मचारी सचिन जाधव व गोकुळ वडघे यांनी समजूत घालण्याचा प्रयत्न केला. तरी देखील इसम ऐकत नसल्याने येथील पोलिसांनी इंदिरानगर पोलीस ठाण्यात कळवले.

इंदिरानगर पोलीस स्थानकातील पोलीस घटनास्थळी आले असता, संशयित प्रभाकर चव्हाण, प्रमोद शिंदे, मेहुल शहा, परवेज सराफ मणियार (सर्व राहणार घोटी) यांना ताब्यात घेऊन सरकारी कामात अडथळा आणला म्हणून गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या