Thursday, May 2, 2024
Homeनाशिकआजपासून जिल्ह्यातील वस्तीगृहे बंद; विदयार्थ्यांची गावी जाण्यासाठी लगबग

आजपासून जिल्ह्यातील वस्तीगृहे बंद; विदयार्थ्यांची गावी जाण्यासाठी लगबग

नाशिक : राज्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनाने शाळा महाविद्यालय बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यातील शासकीय तसेच खाजगी मंडळांचे वस्तीगृह देखील बंद करण्यात आले आहे. त्यामुळे सकाळपासूनच विद्यार्थ्यांची गावी जाण्यासाठी बस स्थानकावर लगबग सुरू आहे.

जगभरात धुमाकूळ घालत असलेल्या कोरोना व्हायरसचा शिरकाव राज्यातही पसरू लागला आहे. या पार्श्वभूमीवर कोरोना व्हायरसचा फैलाव होऊ नये यासाठी राज्य शासन उपायोजना करीत आहे. यासाठी शाळा महाविद्यालय ३१ मार्चपर्यंत बंद करण्यात येत आहे.

- Advertisement -

त्यामुळेच शहरातील शासकीय तसेच खाजगी वसतिगृहे रिकामी करण्यात येत आहे. वसतिगृहातील विद्यार्थी वस्तीगृह बंद करण्यात आल्याने गावी जात आहे. तसेच काही स्पर्धापरीक्षांचे वर्ग देखील बंद झाल्याने येथील विद्यार्थीही रूम अथवा गावी जाऊन अभ्यास करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या