Sunday, May 19, 2024
Homeनाशिकत्र्यंबकेश्वर : द्राक्ष पंढरीला कोरोनाची ‘नजर’; गावोगाव जाऊन वीस रुपये किलोने विक्री

त्र्यंबकेश्वर : द्राक्ष पंढरीला कोरोनाची ‘नजर’; गावोगाव जाऊन वीस रुपये किलोने विक्री

हिरडी : लॉक डाऊन च्या काळात शेतकऱ्याची परिस्थती बिकट झाली आहे. मोठं मोठया शहरात निर्यात होणारे द्राक्ष गावोगाव जाऊन वीस रुपये किलो दराने विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

सध्या कोरोना व्हायरसमुळे सगळीकडे परिस्थिती बिकट झाली आहे. सरकारी कर्मचाऱ्यापासून ते शेतकऱ्यांपर्यंत सर्वच हवालदिल झाले आहेत. अशातच शेतकरि मोठ्या संकटात सापडले आहेत. या लॉक डाऊन च्या काळात खरेदीसाठी व्यापारी येत नसल्याने द्राक्षाचे भाव गडगडले असून उत्पादक शेतकरी हतबल झाला आहे. एरव्ही ८० ते १२०रूपये किलोने विकले जाणारे द्राक्ष आता १५ ते २० रूपये किलोने विकले जात आहेत.

- Advertisement -

नेमक्या निर्यातक्षम असणार्‍या द्राक्षबागांना खरेदीसाठी व्यापारी मिळत नसल्याने शेकडो द्राक्ष बागांवर कुर्‍हाड कोसळल्याने जिल्ह्यातील शेतकर्‍यांचे कोट्यवधी रूपयांचे नुकसान होणार असल्याने त्यांच्यावर आर्थिक संकट कोसळले आहे.

तालुक्यातील अनेक शेतकरी परिसरातील गावांत जाऊन द्राक्ष विकत आहेत. तर शहरांकडील शेतकरी शहरातील वसाहतीमध्ये जाऊन द्राक्ष विकत आहेत. सध्या मजूर उपलब्ध नसल्याने शेतकरीच2 बागांची छाटणी करीत आहेत. त्यामुळे हतबल झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी होत आहे.

फेकल्यापेक्षा पोटात गेलेले बरे
तालुक्यातील अनेक द्राक्ष बागायतदारांनी निर्यातीसाठी व्यापार्‍यांशी संवाद साधला होता. पण कोरोनाचे संकट उभे राहिल्याने व्यापाऱ्यांनी वर हात केले. परिणामी रद्द केल्याने द्राक्ष बागायतदारांना आता स्वतः द्राक्ष मातीमोल भावाने विकण्याची वेळ आली आहे. स्वस्तात द्राक्ष मिळत असल्याने ग्राहक खुश आहेत. मात्र उत्पादक संकटात सापडले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या