Friday, May 3, 2024
Homeनाशिकआदिवासी विकास बोगस भरती प्रकरण; फेक वेबसाईट द्वारे भरती करणारा जेरबंद

आदिवासी विकास बोगस भरती प्रकरण; फेक वेबसाईट द्वारे भरती करणारा जेरबंद

नाशिक । आदिवासी विकास विभागाच्या नावाने नोकर भरतीची बोगस जाहिरात देऊन बेरोजगार युवकांची फसवणूक करणाजया संशयितास सायबर पोलिसांनी अटक केली आहे.

यासंशयिताने नियोजनपूर्वक फसवणूक केल्याचा पोलिसांचा अंदाज असून त्याला दोन मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.
आदिवासी विकास आयुक्तालयाच्या नावाने बनावट संकेतस्थळ तयार करून, त्यावर नोकरभरतीची जाहिरात देण्यात आली होती. या जाहिरातीस भुलून अनेक बेरोजगार युवकांनी नोकरीसाठी अर्ज केले होते.

- Advertisement -

नाशिक, पुणे, मुंबई, जळगाव येथील 3199 जागा भरावयाच्याअसल्याचा दावा जाहिरातीत करण्यात आला होता. त्यासाठी सर्वसामान्य गटातील उमेदवारांकडून 500, तर राखीवगटातील उमेदवारांकडून 350 रुपयेही भरून घेण्यात येत होते. या प्रकरणाच भंडाफोड झाल्यानंतर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा तपास नाशिकच्या सायबर पोलिसांकडे देण्यात आला होता.

पोलीस निरीक्षक देवराज बोरसे यांनी सहकाजयांच्या मदतीने संकेतस्थळाची माहिती काढली. या प्रकरणात जितेंद्र रामा तायडे (वय 24, रा़ पुरी, ता़ रावेर, ज़ि जळगाव) याचा हात असल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या.त्याच्याकडून एक लॅपटॉप, मोबाइल व सिम कार्ड जप्त करण्यात आले असून, न्यायालयाने त्याला दोन मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या