Friday, May 3, 2024
Homeनाशिकसिन्नर : वावी येथे सहा जणांविरोधात संचारबंदी भंगाचा गुन्हा

सिन्नर : वावी येथे सहा जणांविरोधात संचारबंदी भंगाचा गुन्हा

वावी : कोरोना विषाणु प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाय योजना अंतर्गत सर्वत्र लॉक डाऊन ची घोषणा करण्यात आली आहे. तसेच संचारबंदी व जमावबंदी देखील लागू आहे. अशा परिस्थितीत विनाकारण सार्वजनिक ठिकाणी फिरणाऱ्या सहा जणांविरोधात पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई करत संचारबंदी मंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

वावी गावात विनाकारण फिरणाऱ्या व तोंडाला मास्क अथवा रुमाल बांधता निष्काळजीपणा दाखवणाऱ्याच्या विरोधात कारवाईच्या बडगा उगारण्यात आला आहे. गावात विनाकारणच तरुण आणि ज्येष्ठ नागरिक देखील घराबाहेर फिरत असल्याची बाब अनेकदा निदर्शनास आली आहे. याबाबत वारंवार तोंडी सूचना करूनही लोक गांभीर्याने घेत नसल्याने सहाय्यक पोलिस निरीक्षक रणजित गलांडे यांच्या नेतृत्वाखालील पोलिस पथकाने रविवारी सायंकाळी गावात रस्त्यावर फिरणाऱ्या व सार्वजनिक ठिकाणी गप्पा झोडणाऱ्यावर कारवाईचा बडगा उगारला.

- Advertisement -

विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्या व दुचाकीवरून पोलिसांना चकवा देणार्‍यांविरोधात कारवाई करण्यात आली. गावातील तीन तरुणांसोबतच निर्‍हाळे येथील रामकृष्ण चिंधु कांदळकर वय 19 याच्यासोबत पंचाळे येथील कुणाल थोरात, विशाल तुपसुंदर यांच्याविरोधात हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कांदळकर याने त्याच्या ताब्यातील विना नंबर असलेली मोटरसायकल थेट सहायक निरीक्षक गलांडे यांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तिघांनीही मोटरसायकल सोडून धूम ठोकली. मात्र, पोलीस कर्मचारी व स्थानिक तरुणांनी कांदळकर याला पकडले.

फरार झालेले त्याचे दोन्ही साथीदार हिस्टरी सीटर असल्याचे पोलिसांनी सांगितले. हवालदार रामदास देसाई यांच्या फिर्यादीवरून वरील सर्वां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाई दरम्यान पोलिसांनी चार दुचाकी देखील ताब्यात घेतल्या.

- Advertisment -

ताज्या बातम्या