Thursday, May 2, 2024
Homeमहाराष्ट्रनाशिक : कुष्ठरोगी स्रियांच्या हातची उब देणारी मायेची गोधडी

नाशिक : कुष्ठरोगी स्रियांच्या हातची उब देणारी मायेची गोधडी

नाशिक : महाराष्ट्रातील कुष्ठरोग्यांसाठी मायेची झालर ठरलेली आनंदवनमधील कुष्ठरोगी सध्या इतरांमायेची झालर देत आहेत. येथील आनंदवन मध्ये कुष्ठरुग्ण स्रिया आपल्या हातांनी गोधड्या शिवत असून याद्वारे जीवन जगण्याची जिद्द निर्माण करण्याचं कार्य आनंदवनमध्ये होत आहे.

बाबा आमटे यांनी १९४९ मध्ये विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यात आनंदवन या संस्थेची स्थापना केली. या संस्थेला ७१ वर्ष पूर्ण होत आहेत. कुष्ठरोग्यांसाठी आनंदवन इथं काम चालते हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. कुष्ठरोग झाला म्हणून समाजाने झिडकारले त्याच कुष्ठरुग्ण स्त्रिया अभिमानाने देशातील नागरिकांवर सुंदर गोधडीच्या रूपाने मायेची पाखर घालताना दिसून येत आहेत. यामुळे येथील स्रियांना रोजगार उपलब्ध होत आहे. तसेच इतरही स्रियांना या माध्यमातून रोजगार मिळत असल्याने या उपक्रमाचे कौतुक होत आहे.

- Advertisement -

आनंदवनात अशा पद्धतीचे अनेक उपक्रम राबविले जातात. ज्याद्वारे येथील रुग्णांना आत्मसन्मानाने सांगण्याची उमेद मिळते. अशाच पद्धतीने स्पर्श नसलेल्या वाकड्या बोटांनी सात साड्यांवर एकेक परफेक्ट टाका घातलेल्या गोधड्या या ठिकाणी बनवल्या जात आहेत. तयार झालेल्या गोधड्या इतर ठिकाणी पाठवल्या जात आहेत. यातून जिव्हाळ्याचे नाते तयार होत आहेत.

हस्तकलाकौशल्याचे धडे देणारे सुतारकाम, शिवणकाम, यंत्रमाग, सतरंजी विभाग आणि इतरही बरेच उद्योग आनंदवनात कार्यरत आहेत. केवळ कुष्ठरोग निर्मुलन एवढंच या संस्थेचं मर्यादित उद्दीष्ट नाही. तर कुष्ठरोगमुक्त झालेल्या स्त्री पुरुषांचे विवाहही इथे घडवून आणले गेलेत. त्यामुळे त्यांचे संसारही आता इथं फुलू लागलेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या