Friday, May 3, 2024
Homeनाशिकसुरगाणा तालुक्यातील ग्रामीण भागात बँक आपल्या दारी

सुरगाणा तालुक्यातील ग्रामीण भागात बँक आपल्या दारी

हतगड : करोना रोगाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी उपाय योजना म्हणून बँकतील गर्दी कमी करण्यासाठी ग्रामीण भागात बँक आपल्या दारी हा उपक्रम सुरगाणा तालुक्यात राबविण्यात आला.

दरम्यान सध्या लॉक डाऊनच्या काळात रोजगार नसल्याने ग्रामीण भागातील लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. यामुळे गावातील अनेक लोकांना तालुक्याच्या ठिकाणी जाणे जमत नसल्याने तालुक्यातील देना बँक(बँक ऑफ बडोदा) थेट गावात पोहोचली.

- Advertisement -

खोकर विहीर येथे अधिकारी व कर्मचारी यांनी येऊन बँक खात्यातुन पैसे काढणे, जमा करणे तसेच खाते आधार लिंक करणे, बंद खाते चालू करणे, मोबाईल नंबर लिंक करणे त्याच बरोबर प्रधानमंत्री जनधन योजने अंतर्गत महिलांच्या खात्यावर जमा झालेले रू ५०० महिलांना काढून देण्याचे काम करण्यात आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या