Friday, May 3, 2024
Homeनाशिकजिल्ह्यात करोनाग्रस्तांचा आकडा १४१५ वर; नव्याने ३१ रूग्णांची भर

जिल्ह्यात करोनाग्रस्तांचा आकडा १४१५ वर; नव्याने ३१ रूग्णांची भर

नाशिक : मालेगावमध्ये करोनाचा उद्रेक सुरुच असून या पाठोपाठ नाशिक शहरासह ग्रामिण जिल्ह्यात करोनाचे रुग्ण वाढत चालले आहेत.

आज शहरात नव्याने ३० रूग्णांची भर पडली. यात स्नेह नगर दिंडोरी रोड ०५, पखालरोड ०२, सिडको सावरकर चौक ०२, गंजमाल ०२, हिरावाडी ०१, सातपूर कॉलनी ०१, खोडे नगर ०८, रामकृष्ण नगर मखमलाबाद रोड ०१, शिवशक्ती चौक सिडको ०७, जाधव संकुल ०१ यामुळे शहरात दिवसभरात एकूण ४२ रुग्णांची नोंद करण्यात आली. तर मालेगाव येथील एका नव्या रुग्णाची नोंद करण्यात आली आहे.

- Advertisement -

तर सकाळी आलेल्या अहवालात १४ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले होते. यात मालेगाव शहरातील ८ व ग्रामिण भागातील ६ रूग्णांचा समावेश आहे. यामुळे जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या १४१५ वर पोहोचली आहे. दिवसभरात १७ रुग्ण करोनामुक्त झाल्याने करोनावर मात करणारांची संख्या ९१९ वर पोहचली आहे.

आज दिवसभरात जिल्हा प्रशासनास प्राप्त झालेल्या अहवालांमध्ये मालेगाव शहरातील ०८ पॉझिटिव्ह रूग्ण आढळले आहेत. यामुळे मालेगाव शहराचा आकडा ८११ वर पोहचला आहे. ग्रामिण भागातील आज ३ रूग्ण आढळून आले आहेत. यात येवला येथील १, अोझर १, जामनेर १ येथील असून यामुळे ग्रामिण भागातील रूग्णांचा आकडा २२१ झाला आहे.

तर जिल्ह्यात आज दोघांचा मृत्यू झाला असल्याने एकुण मृत्यू झालेल्यांचा आकडा ७९ झाला आहे. तसेच जिल्ह्यात आज १७ रुग्ण करोना मुक्त झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. यामुळे करोनामुक्त होणारांचा आकडा ९१९ वर पोहचला आहे.

दरम्यान जिल्ह्यात आजपर्यंत १२ हजार ९४१ स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. यातील ११ हजार २६२ निगेटिव्ह आले आहेत, १४१५ पॉझिटिव्ह आले आहेत. आज नव्याने १४९ संशयित रूग्ण दाखल झाले आहेत. यात नाशिक शहरातील ९१, जिल्हा रूग्णालय १६, ग्रामिण भागातील २१, मालेगाव १७ संशयित रूग्णांचा सामावेश आहे.

जिल्हा प्रशासनाच्या अहवालानुसार
* एकूण कोरोना बाधित: १४१५
* मालेगाव : ८१२
* नाशिक : २८८
* उर्वरित जिल्हा : २२१
* जिल्हा बाह्य : ६४
* एकूण मृत्यू : ७९
* करोनामुक्त : ९१९

- Advertisment -

ताज्या बातम्या