Monday, May 6, 2024
Homeनगर12 हजारांचे हातभट्टी रसायन जप्त; नगर तालुका पोलिसांची नेप्ती गावात कारवाई

12 हजारांचे हातभट्टी रसायन जप्त; नगर तालुका पोलिसांची नेप्ती गावात कारवाई

अहमदनगर (प्रतिनिधी) – बेकायदा गावठी दारू तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे बारा हजार रुपये किंमतीचे दोनशे लीटर रसायन पोलिसांनी छापा टाकून जप्त केले आहे. नगर तालुका पोलिसांनी शनिवारी दुपारी बारा वाजता नेप्ती गावातील एका घरी ही कारवाई केली. मात्र, रसायन तयार करणारे त्या ठिकाणाहून पसार झाले. याप्रकरणी मोहन शिवाजी पवार, उषा मोहन पवार या दोघा पती-पत्नी विरोधात तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
कोरोना संसर्गाचा फैलाव होऊ नये म्हणून जिल्ह्यात संचारबंदी व जमावबंदी आदेश जारी केला आहे. जिल्हा पूर्ण लॉक डाऊन करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत काही लोक फायदा घेऊन गावठी हातभट्टी दारू तयार करून तिची विक्री करत आहे. नेप्ती गावात एका घराच्या मजल्यावर गावठी हातभट्टी दारू तयार केली जात असल्याची माहिती नगर तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकरसिंग रजपूत यांना मिळाली होती.
त्यांनी आपल्या पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. पोलीस उपनिरीक्षक रितेश राऊत, पोलीस नाईक योगेश ठाणगे, विनोद पवार, बापू फोलाणे यांच्या पथकाने नेप्ती गावातील आरोपी पवार याच्या घरावर छापा टाकला. बारा हजार रुपये किंमतीचे दोनशे लीटर रसायन जप्त करून ते नष्ट केले. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास तालुका पोलीस करत आहे.
- Advertisment -

ताज्या बातम्या