Saturday, November 16, 2024
Homeनगरसुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात पाथर्डी तहसीलवर मोर्चा

सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात पाथर्डी तहसीलवर मोर्चा

पाथर्डी (तालुका प्रतिनिधी)– सुधारित नागरिकत्व दुरुस्ती कायदा म्हणजे देशातील बहुजनांचे खरे नुकसान होणार असून देशाला अराजकतेकडे नेणारा आहे. धर्म व जातीच्या आधारावर देशाची फाळणी करण्याचा डाव सर्वशक्तीनिशी हाणून पाडण्यासाठी एक व्हा असे आवाहन करत संविधान बचाव नागरी कृती समितीच्यावतीने तहसील कार्यालयावर काढण्यात आलेल्या निषेध मोर्चामध्ये तालुक्यातील मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले.

आंबेडकर पुतळ्यापासून नवी पेठ मार्गे शहरातून अत्यंत जोशपूर्ण घोषणा देत मोर्चा निघाला वाहतूक कुंडली सुरळीत करण्यासाठी प्रमुख चौकांमध्ये बंदोबस्त वाढवण्यात आला तहसील कार्यालयाच्या आवारात मोर्चाला सभेचे रूप आले. यावेळी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष नासीर शेख, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष सिताराम बोराडे,नगरसेवक बंडू बोराडे, दिगंबर गाडे, डॉ.रामदास बर्डे, वंचित बहुजन आघाडीचे अरविंद सोनटक्के, हजरत मुफ्ती सालेसाब, हर्षद शेख, डॉ.दीपक देशमुख,शिवशंकर राजळे,सुभाष घोडके,प्रा.श्रीकांत काळोखे, प्रा.किसन चव्हाण,मौलाना इर्शाद साहब फारुक शेख, हुमायून आतार आदींसह विविध पक्ष व संघटनांच्या कार्यकर्त्यांनी विचार मांडले.

- Advertisement -

यावेळी मौलाना इर्शाद म्हणाले की लढाई फक्त म्हणाले की लढाई मुस्लिमांची नाही.सर्व ओबीसींच्या अस्तित्वाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे.तलाक बंदी कायदा,370 वे कलम रद्द व गोहत्याच्या नावावर मुस्लिमावर झालेले अत्याचार असे सर्व काही आम्ही सहन केले आता सर्वशक्तिनिशी प्रतिकारास सज्ज व्हा. सुधारित नागरिकत्व कायद्यामुळे अनेक गोंधळ व संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. केंद्र सरकारच्या विरोधात लोकांच्या मनात तीव्र असंतोष व्यक्त होत आहे या कायद्याची राज्यात अंमलबजावणी होऊ देऊ नये.यावेळी वंचित बहुजन आघाडीचे राज्य समन्वयक प्रा. किसन चव्हाण म्हणाले नव्या कायद्यान्वये विशिष्ट समाजाला टार्गेट करून वेगळे पाडण्याचा प्रयत्न आहे संख्याबळाच्या आधारावर देशाला हुकूमशाहीकडे नेणारा प्रकार खपवून घेणार नाही.

या कायद्यामुळे मुस्लिमांमध्ये भीतीचे वातावरण असले तरी जास्त नुकसान बहुजन हिंदूंचे होणार आहे. पाकिस्तान,बांगलादेश,अफगाणिस्तान या देशांतून मुस्लिम वगळून अन्य धर्मीयांना भारतीय नागरिकत्व देऊन सरकार मूळ भारतीय लोकांकडे कागदपत्रे नसेल तर त्यांना देशाबाहेर जावे लागणार असा कायदा सहन करणार नाही. सर्व आघाड्यांवर सरकार अपयशी ठरले असून लक्ष विचलीत करण्यासाठी व चार्तुवन्य व्यवस्था पुन्हा आणण्यासाठी नव्या कायद्याचा घाट घालण्यात आला आहे. मोदी – शहांना नव्हे तर हाफ चड्डीवाले नागपूरकरांना या कायद्याची गरज आहे.

नागपूरचे मोहन भागवत पुरावे मागतात खरे तर त्यांच्याच डी.एन.ए. तपासण्याची गरज आहे. दुसर्‍या स्वातंत्र्यलढ्यासाठी बहुजन वंचितांनी एकत्रितपणे सज्ज व्हावे.संघाच्या मुख्यालयावर तिरंगा नाहीतर भगवा आहे यावरून त्यांची मानसिकता लक्षात येते बॉम्बस्फोट करणारे सत्तेत बसले आहेत. मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञासिंह या देशाच्या संरक्षण समितीच्या सदस्य आहेत.आज मुस्लिम बांधवांना टार्गेट केले गेले उद्या भटके आदिवासींवर वेळ येणार आहे.

यावेळी नायब तहसीलदार श्रीमती उमाप यांनी निवेदन स्वीकारले.आंदोलन यशस्वी करण्यासाठी नासिर शेख,जुनेद पठाण, फारुक शेख ,मुन्ना खलिफा ,परवेझ पठाण, मौलाना शफिक, संजय नागरे, किशोर डांगे,मौलाना अहमद जावेद पठाण आदींनी परिश्रम घेतले. राष्ट्रगीताने आंदोलनाची सांगता झाली हुमायून आतार यांनी आभार मानले.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या