Monday, May 6, 2024
Homeनगरआता घरपोहच पेन्शन !

आता घरपोहच पेन्शन !

वृद्ध, अपंगांसाठी पोस्ट व बँकांची सुविधा

अहमदनगर (प्रतिनिधी) – अत्यंत वयस्कर व अंपग पेन्शनरांना घरपोहच पेन्शन देण्याची व्यवस्था पोस्ट खात्याने सुरू केली आहे. त्याचसोबत नगर तालुक्यात वक्रांगी केंद्राने आधार संलग्न असलेल्या ग्राहकांना बँकिंग सेवा देण्यास सुरूवात केली आहे. बडोदा, बॅक ऑफ इंडिया तसेच युनियन बॅक ऑफ इंडियाच्या ग्राहकांना ही सुविधा दिली जात आहे.

- Advertisement -

कोरोना विषाणूच्या फैलावामुळे संपूर्ण देशासह महाराष्ट्रात लॉकडाऊन जाहीर केले आहे. अशा परिस्थितीत वक्रांगी लिमिटेड कंपनीतर्फे नगर तालुक्यात बँकिंग, एटीएम, ऑनलाईन औषधे, पैसे हस्तांतरण यासारख्या अत्यावश्यक सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. लॉकडाऊनच्या काळात नगर तालुक्यातील 10 केंद्र व 15 एटीएम च्या माध्यमातून वक्रांगी केंद्र नागरिकांचा आधार बनली आहेत. जमावबंदी, संचारबंदीमुळे नागरिकांना घराच्या बाहेर पडणे अवघड झाले आहे.

या लॉकडाउनच्या काळातही तालुक्यातील बँकिंगसेवा एक पाऊल पुढे असून जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात किमान एक हजार लोकांना ही सेवा देण्यात येत आहे. सध्याच्या परिस्थितीत नागरिकांना येण्या जाण्याच्या अडचणी, गर्दी टाळणे आदी समस्यांमुळे ही सेवा महत्वाची ठरत आहे. वक्रांगी केंद्रावर ग्राहकांसाठी हात धुण्याची व्यवस्था करण्यात आली असून सॅनिटायझर देऊन ग्राहकांना स्वच्छतेचे नियम पाळण्यास सांगितले जात आहेत. तसेच ग्राहकांमध्ये सोशल डिस्टन्सही राखला जात असल्याचे तालुका व्यवस्थापक शरद निमसे यांनी सांगितले.

संचारबंदी काळात अहमदनगर डाक विाागातील अत्यंत वयस्कर व अंपग पेन्शनर यांच्यासाठी घरपोच पेन्शन देण्याची व्यवस्था केली आहे. अशा पेन्शन धारकांनी त्यांच्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये संपर्क साधावा किंवा विाागीय कार्यालयास (फोन 0241-2355010) व प्रधान डाकघर कार्यालय , अहमदनगर (0241-2355036) संपर्क साधण्याचे आवाहन वरिष्ठ अधीक्षक जे टी ोसले यांनी केले आहे.

विाागातील खेडोपाडयामध्ये जे विविध राष्ट्रीयकृत बँकाचे ग्राहक आहेत व ज्यांचे खाते आधार संलग्न आहे. त्यांना देखील लॉकडाऊन परिस्थितीमुळे त्यांचे बॅक खात्यातील पैस काढण्यास अडचण निर्माण होत आहे. परंतू अशा ग्राहकांना देखील तेथील संबंधीत पोस्टमान मार्फत एका वेळेस दहा हजार रुपये पर्यन्त आधार संलग्न ाुगतान प्रणाली द्वारे पैसे देण्याची व्यवस्था केली आहे. बँकेच्या ग्राहकांना देखील अशी सुविधा पोस्टमन मार्फत घरपोच मिळाल्याने त्यांना घराबाहेर पडण्याची आवश्यकता नाही. बँकेच्या ग्राहकांना त्यांचे पैसे काढण्यात अडचण येत आहे. त्यांनी आपल्या ाागातील पोस्टमन / ग्रामीण डाक सेवक यांच्याशी संपर्क साधावा असे ोसले यांनी सांगितले

.

- Advertisment -

ताज्या बातम्या