Thursday, May 2, 2024
Homeनगरपोलिसांना दरमहा दिला जाणारा पगार पूर्ण देण्यात यावा- कोते

पोलिसांना दरमहा दिला जाणारा पगार पूर्ण देण्यात यावा- कोते

शिर्डी (शहर प्रतिनिधी)- कोरोनाचा प्रादूर्भाव राज्यात वाढला असून संचारबंदीकाळात स्वतःच्या जिवाची व परिवाराची पर्वा न करता रस्त्यावर येणार्‍या नागरिकांना घरात बसण्याचे आवाहन करुन नागरिकांच्या शाब्दिक व वेळप्रसंगी अंगावर प्रहार सोसत प्रथम देशसेवेला प्राधान्य देणार्‍या पोलीस बांधवाना दरमहा दिला जाणारा पगार पुर्ण देण्यात यावा, अशी मागणी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष राकेश कोते यांनी निवेदनपत्राद्वारे केली आहे.

याबाबत कोते यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशात तसेच राज्यात खबरदारीचा उपाय म्हणून लॉकडाऊन घोषित करण्यात आले आहे. सध्या स्तितीत देशात राज्यात सर्वात जास्त कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढली आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी रस्त्यावर महाराष्ट्र पोलीस बांधव कुटुंबाची पर्वा न करता दिवसरात्र निगराणी करत आहे.

- Advertisement -

आजच्या घटकाला डॉक्टरांबरोबर पोलीस देखील नागरिकांसाठी देवदुतच बनले आहे. एकीकडे आपल्या डोळ्यासमोर कुटुंबाची खाण्यापिण्याची झालेली वाताहात होत असतांना दुसरीकडे प्रथम देशरक्षणाची जबाबदारी प्रामाणिकपणे बजावण्याचे काम हे पोलीस अहोरात्र करीत आहे.

अशावेळी या पोलीस बांधवांना राज्य शासनाकडून दरमहा मिळणारे वेतन हे एकरकमी देण्यात यावे. यामध्ये कोणत्याही प्रकारची कपात करू नये अथवा दोन टप्प्यात देऊ नये. सदरील पगार हा नेहमीप्रमाणे एकरकमी देऊन पोलीस बांधवांचे मनोधैर्य वाढवणे काळाची गरज आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या