Friday, May 3, 2024
Homeनगरमोकाट फिरणार्‍यांना पुन्हा पोलिसांनी दिला प्रसाद

मोकाट फिरणार्‍यांना पुन्हा पोलिसांनी दिला प्रसाद

प्रशासनाच्या आवाहनानंतर विनाकरणा गर्दी

अहमदनगर (प्रतिनिधी)- कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून वेगवेगळे उपाय करण्यात येत आहे.परंतू, नगरकरांकडून प्रशासनाच्या आदेशाचा भंग केला जात आहे. मंगळवारी सकाळी शहरात कोरोना ससंर्ग रोखण्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात संचार बंदी लागू केली आहे. मंगळवारी नगरकरांनी या आदेशाकडे दुर्लक्षित केले. त्यामुळे रस्त्यावर फिरणार्या नगरकरांना पोलिसांनी प्रसाद देण्यास सुरूवात केली आहे.
नगरकर सकाळी भाजी खरेदीसाठी, पेट्रोल भरण्यासाठी घराबाहेर पडले.

- Advertisement -

रस्तावर एकाच वेळी गर्दी केली होती. दरम्यान, शहरात ठिकाणी बाहेरून येणार्‍या लोकांसाठी नाकाबंदी करण्यात आली आहे. शहरात मंगळवार भाजी बाजार भरला आणि काही तासात पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली. तसेच, भिंगारमध्ये बाजार भरला होता. पोलिसांनी तो उधळून लावला. सकाळी शहरात पोलिसांनी कडेकोट बंद केल्यामुळे रस्त्यावरील गर्दी कमी झाली. त्यानंतर ठिकठिकाणी पोलिसांकडून वाहनचालकांना अडविण्यात येत होते. त्यांचे ओळखपत्र पाहून आणि घराबाहेर पडण्याचे ठोस कारण असलेल्यांनाच जाऊ दिले जात होते. या तपासणीमुळेही विनाकारण बाहेर पडणार्यांना मोठा प्रतिबंध बसला.

नागरी भागात खासगी वाहने आणि खाजगी प्रवासी वाहनांना प्रतिबंध असतानाही काही नागरिक मोकळ्या रस्त्यांवर येत होते. हे रोखण्यासाठी स्वत: जिल्हाधिकारी द्विवेदी रस्त्यावर उतरले. त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक सागर पाटील आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांच्यासह या वाहनचालकांना रोखून त्यांना समज दिली. जे वाहनचालक विनाकारण रस्त्यात फिरत होते, त्यांच्यावर कारवाईचे निर्देशही त्यांनी दिले. शहरातील परिस्थिती पाहण्यासाठी जिल्हाधिकारी स्वता बाहेर पडले. कोरोनाचा धोका वाढत असल्याने व वारंवार सूचना करूनदेखील लोक घराच्या बाहेर पडत असल्याने प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या