Friday, November 15, 2024
Homeनगरराहाता पंचायत समितीच्या सभापती व उपसभापतींची बिनविरोध निवड

राहाता पंचायत समितीच्या सभापती व उपसभापतींची बिनविरोध निवड

राहाता (तालुका प्रतिनिधी)- राहाता पंचायत समिती सभापतिपदी विखे गटाच्या नंदाताई तांबे तर उपसभापतिपदी ओमेश जपे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

पंचायत समिती सभापती व उपसभापती पदाची निवड बिनविरोध पार पडली. सकाळी माजीमंत्री राधाकृष्ण विखे पा. यांच्या उपस्थितीत सभापतिपदासाठी तांबे यांचा तर उपसभापतिपदासाठी जपे यांचा प्रत्येकी एकच अर्ज दाखल झाला होता.

- Advertisement -

सर्वच्या सर्व 10 सदस्य विखे गटाचे असल्याने या निवडी बिनविरोध पार पडल्या. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी उदय किसवे तर सहायक म्हणून गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे यांनी काम पाहिले.

सभापतिपदी दाढ गणातील नंदाताई गोरक्षनाथ तांबे यांची तर उपसभापतिपदी सावळीविहीर गणातील ओमेश साहेबरीव जपे यांची बिनविरोध निवड झाली. यावेळी जि. प. माजी अध्यक्षा शालिनीताई विखे, मावळत्या सभापती हिराबाई कातोरे, बाजार समिती सभापती बापूसाहेब आहेर, बबलू म्हस्के, प्रतापराव तांबे, भाऊ कातोरे, जि. प. सदस्य व पंचायत समिती सदस्य उपस्थित होते.

मागील वर्षी सभापतिपद गणेश परीसराला दिले गेले तर उपसभापती पद प्रवरा परीसराला दिले होते. यावेळी सभापतिपद प्रवरा परीसराला दिले व उपसभापती गणेश परिसराला देऊन विखे यांनी समतोल राखला. पंचायत समितीत एकहाती सत्ता विखे गटाची असल्याने या निवडी बिनविरोध पार पडल्या.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या