Friday, November 15, 2024
Homeनगरसंगमनेर येथे रविवारी ना. पायलट, पटोले, थोरात, कोल्हे यांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण

संगमनेर येथे रविवारी ना. पायलट, पटोले, थोरात, कोल्हे यांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण

संगमनेर (प्रतिनिधी) – राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट, ना. नाना पटोले, खासदार डॉ. अमोल कोल्हे, ना. बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत जयंती महोत्सवानिमित्त रविवार 12 जानेवारी 2020 रोजी मालपाणी लॉन्स येथे प्रेरणादिन, पुरस्कार वितरणसह व विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आ. डॉ. सुधीर तांबे, बाजीराव खेमनर, अ‍ॅड. माधवराव कानवडे, रणजितसिंह देशमुख, इंद्रजित थोरात यांनी दिली.

यशोधन कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी माहिती दिली. यावेळी बाबा ओहोळ, केशवराव जाधव,कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, तालुका विकास अधिकारी बापूसाहेब गिरी आदी उपस्थित होते. या पुरस्काराबाबत अ‍ॅड. माधवराव कानवडे व रणजितसिंह देशमुख माहिती देताना सांगितले, यावर्षीचा जयंती महोत्सव मालपाणी लॉन्स येथे होणार असून या जयंती महोत्सवात रविवार 12 जानेवारी रोजी दुपारी 12.30 वा. पे्ररणादिनानिमित्त अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या वतीने सहकार, साहित्य, समाजसेवा, पर्यावरण या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल यावर्षीचा स्वातंत्र्यसैनिक भाऊसाहेब थोरात स्मृती पुरस्कार एबीपी माझाचे मुख्य संपादक राजीव खांडेकर यांना तर कृषी शिक्षण व संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल डॉ. अण्णासाहेब शिंदे स्मृती पुरस्कार पर्यावरण तज्ञ डॉ. गिरीश गांधी यांना आणि सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सेवाभावी संस्थेचा सहकारातील सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार विघ्नहर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर व सौ. योगिता शेरकर यांना जाहीर झाला आहे.

- Advertisement -

हा पुरस्कार वितरण सोहळा राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट व युवा खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या हस्ते व विधानसभेचे सभापती नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. सायंकाळी 6.30 भैरव ते भैरवी सूरसंध्या तर सोमवार दिनांक 13 जानेवारी रोजी सायंकाळी 6.30 वा अवधुत गुप्ते यांचा म्युझिकल नाईट हा कार्यक्रम होणार आहे. तसेच मंगळवार 14 जानेवारी रोजी सायंकाळी 6.30 वा. युवा जल्लोष धमाका हा विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. या पुरस्कारार्थींची निवड विजय आण्णा बोर्‍हाडे, उल्हासराव लाटकर, डॉ. राजीव शिंदे, प्राचार्य केशवराव जाधव, उत्कर्षा रुपवते, प्रा. बाबा खरात यांच्या निवड समितीने केली असून एक लाख रुपये व सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप आहे. या कार्यक्रमासाठी संगमनेर तालुक्यातील व जिल्ह्यातील जास्तीतजास्त नागरिकांनी उपस्थित राहून या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात व डॉ. अण्णासाहेब शिंदे जयंती महोत्सव समिती व अमृत उद्योग समूहाच्या वतीने करण्यात आले आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या