Friday, May 3, 2024
Homeनगर‘माध्यमिक’च्या छाननीत 17 अर्ज बाद

‘माध्यमिक’च्या छाननीत 17 अर्ज बाद

14 ते 28 जानेवारी दरम्यान उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी मुदत

अहमदनगर (वार्ताहर)- माध्यमिक शिक्षक सोसायटीची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. सोमवारी दाखल उमेदवारी अर्जांच्या छाननीची प्रक्रिया पार पडली. यात वेगवेगळ्या कारणांमुळे 17 इच्छुकांचे अर्ज बाद झाले आहेत. बाद झालेल्यांमध्ये काही शिक्षक नेत्यांचा समावेश आहे.

- Advertisement -

माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या 21 संचालक पदाच्या जागांसाठी 340 अर्ज दाखल झाले होते. सोमवारी (दि. 13) झालेल्या अर्ज छाननी प्रक्रियेत 17 अर्ज बाद झाले असून 223 अर्ज वैध ठरले आहेत. बाद झालेल्या अर्जांमध्ये सर्वसाधारण 14, महिला 2, तर अनु जाती / जमातीच्या एका इच्छुकाचा असा समावेश आहे. 10 हजार 203 मतदार असलेल्या माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या संचालक मंडळाची निवडणूक 9 फेब्रुवारीरोजी रोजी होत असून 14 ते 28 जानेवारी दरम्यान उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी मुदत देण्यात आली आहे.

दरम्यान अर्ज माघारी घेण्याच्या अंतिम तारखे नंतरच निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे. अर्ज बाद झालेल्यामध्ये शिक्षक नेते राहुल बोरूडे, सुनील गाडगे यासह अन्य शिक्षकांचा समावेश आहे.

हे अर्ज झाले बाद
सर्वसाधारण उमेदवारांमध्ये- शंकर भास्कर उंडे, सुनील शिवनाथ कवडे, सुनील अनंतराव गाडगे, राजू पांडुरंग डुबल, सोपान रामराव सातरकर, राहुल विनायक बोरुडे, संतोष मुरलीधर टावरे, सीताराम भीमराव शेलार, जगताप शरद सोपान, सुहास लक्ष्मण महाजन, माणिक गहिनीनाथ मेहेत्रे, संतोष बन्सी म्हस्के, शशिकांत रुपचंद काकडे, बाळासाहेब जगन्नाथ जाधव. तर महिला राखीव- शारदा जयप्रकाश पाटील, मुक्ता सुभाष लांडे, अनु जाती जमाती- राजेंद्र काशिनाथ सोनावणे यांचा समावेश आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या