अहमदनगर (वार्ताहर)- माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या संचालक मंडळाच्या 21 जागांसाठी 9 फेब्रुवारी रोजी निवडणूक होत असून सत्ताधारी पुरोगामी सहकार व विरोधी परिवर्तन आघाडी यांच्यातच खरी लढत होणार आहे. पुरोगामी आघाडीस छत्री तर परिवर्तन आघाडीस कपबशी चिन्ह मिळाले आहे. जनसेवा बहुजन आघाडीचा लंगडा पॅनेल झाला आहे. या सर्व उमेदवारांनी आता जोरदार प्रचार सुरू केला आहे. त्यामुळे आगामी काळात कलगीतुरा रंगण्याची चिन्हे आहेत.
10 हजार 203 मतदार असलेल्या माध्यमिक शिक्षक सोसायटी संचालक पदाच्या 21 जागांसाठी 340 अर्ज दाखल झाले होते. छाननी प्रक्रियेत 17 अर्ज बाद झाले. अर्ज माघारीसाठी काल शेवटच्या दिवशी 90 जणांनी आपले अर्ज मागे घेतले. त्यामुळे लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. आता निवडणूक रिंगणात 90 उमेदवारी अर्ज शिल्लक राहिले आहेत. त्यात सर्वसाधारण जागांसाठी 70 अर्ज, महिला राखीवसाठी 7, ओबीसीसाठी 3, अनुसूचित जातीजमातीसाठी 5, तर भटक्या विमुक्त साठी 5 अर्ज शिल्लक राहिले आहेत. सोसायटीच्या निवडणुकीत सत्ताधारी पुरोगामी सहकार व विरोधी परिवर्तन आघाडी यांच्यातच लढत असून दोन्ही आघाडीच्या विरोधात दंड थोपटलेल्या तिसर्या जनसेवा बहुजन आघाडीला 21 जागांपैकी केवळ 8 जागांवरच उमेदवार देता आले आहेत. दोन्ही गटांनी जोरदार तयारी केली असल्याने चुरस वाढणार आहे.
पुरोगामी आघाडीचे उमेदवार – सर्वसाधारण -भाऊसाहेब कचरे (पाईपलाईन रोड, नगर), धनंजय म्हस्के (पाईपलाईन रोड, नगर), सुर्यकांत डावखर (भैरवनाथनगर, श्रीरामपूर), ज्ञानेश्वर काळे (तामसवाडी, ता. नेवासा), अण्णासाहेब ढगे (कळस, ता. अकोले),अनिल गायकर (मोग्रस, ता. अकोले), सत्यवान थोरे (शेवगाव), सुरेश मिसाळ (पाथर्डी), संजय कोळसे (आंबी, ता. राहुरी), दिलीप काटे(वागंदरी, ता. श्रीगोंदा), काकासाहेब घुले (रांजणी,ता. शेवगाव), बाळासाहेब सोनवणे (कोपरगाव), नंदकुमार दिघे (धानोरे, ता. राहुरी), अशोक ठुबे (कान्हुर पठार, ता. पारनेर), कैलास राहणे (चंदनापुरी, संगमनेर), चांगदेव खेमनर (ओझर, संगमनेर).
अनुसूचित – धोंडीबा राक्षे (दरेवाडी, नगर), भटक्या विमुक्त -दिलावर फकीर (पाथर्डी), ओबीसी-अजित वडावकर(डिकसळ, ता. कर्जत), महिला राखीव -आशा कराळे (नगर), मनीषा म्हस्के (नगर)
परिवतर्न आघाडीचे उमेदवार : सर्वसाधारण -आप्पासाहेब शिंदे देहरे, ता. नगर), बाबासाहेब बोडखे (नगर),अंबादास राजळे (कासार पिंपळगाव, ता. पाथर्डी), भीमाशंकर तोरमल (पिंपळगाव निपाणी, अकोले), राजेंद्र गवांदे (जांभळी, ता. अकोले), उमेश गुंजाळ (संगमनेर),दिलीप डोंगरे (वडगाव लांगडा, ता. संगमनेर), रामनाथ शेळके (वाकडी, ता. राहाता), बाळासाहेब जाधव (येवले आखाडा, ता. राहुरी, बाबासाहेब पवार (भेर्डापूर, ता. श्रीरामपूर), सुनील दानवे (घोडेगाव, ता. नेवासा), शशिकांत काकडे (आव्हाने खुर्द, ता. शेवगाव), अरविंद देशमुख (नांदुर निंबादैत्य, ता. पाथर्डी),शिरीष टेकाडे(नगर),भगवान राऊत (वडझिरे, ता. पारनेर),नंदकुमार शितोळे(नगर)
महिला -ज्योति वारुळे(ब्राम्हणगाव भांड, ता. श्रीरामपूर), जान्हवी गाडगे (नगर), ओबीसी-महेंद्र हिंगे(वाळूंज, ता. नगर), अनुसूचित जाती-बाजीराव जाधव (पाटेगाव, ता. कर्जत), भटक्या विमुक्त-वसंत खेडकर(भालगाव, ता. पाथर्डी).
अन्य उमेदवार- ज्ञानदेव अकोलकर (नागापूर, नगर), मुकुंद अंचवले (वरूर, ता. शेवगाव), विनायक कचरे (पाडळी, ता. पाथर्डी), उध्दव गुंड (नगर), चंद्रकांत चौगुले (ढवळपुरी, ता. पारनेर), राजेंद्र जंगले (देवराई, ता. नेवासा), बाळासाहेब तांबे (मुसळवाडी, ता. राहुरी), आमोद नलगे(कोळगाव, ता. श्रीगोंदा), भाऊसाहेब पगारे (राहुरी फॅक्टरी, ता. राहुरी), सुनीता पटेकर (वडगाव आसणी, ता. पारनेर), गीताराम वाघ (तिसगाव, ता. पाथर्डी), आत्माराम शिदोरे (मांडवे, ता. पाथर्डी), दादा साळुंके (कोळगाव, ता. श्रीगोंदा), सुनंदा जाधव (मल्हारवाडी, ता. राहुरी), सुनीता पटेकर (नगर), हिराबाई लंके (घोडेगाव, ता. नेवासा), बाळासाहेब पिले (मानोरी, ता. राहुरी), सुरज घाटविसावे (सावेडी, नगर), अशोध पलघडमल (राहुरी), मारूती भालेराव (ढवळपुरी, ता. पारनेर), बाळासाहेब तांबे (मुसळवाडी, ता. राहुरी), छगन पानसरे (शेवगाव).