Thursday, May 2, 2024
Homeनगरश्रीरामपुरातील दुकाने सुरू करण्यासंदर्भात व्यापारी, महसूल प्रशासन यांच्यात बैठक

श्रीरामपुरातील दुकाने सुरू करण्यासंदर्भात व्यापारी, महसूल प्रशासन यांच्यात बैठक

श्रीरामपूर (प्रतिनिधी)- शहरामध्ये दि. 17 मे पर्यंत लॉकडाऊन आहे. नंतर लॉकडाऊन शिथील करून दुकाने सुरू करण्यासंदर्भात मर्चंट्स असोसिएशनने लेखी प्रस्ताव द्यावा, तो जिल्ह्याधिकार्‍यांनी मंजूर केल्यानंतर व्यापार सुरू करता येईल, असे आमदार लहू कानडे यांनी सांगितले.

शहरातील दुकाने सुरू करण्यासंदर्भात व्यापारी, महसूल प्रशासन यांच्यात काल बैठक झाली. यावेळी आमदार कानडे बोलत होते. यावेळी नगराध्यक्ष अनुराधा आदिक, उपनगराध्यक्ष करण ससाणे, भाजपचे प्रकाश चित्ते, शिवसेनेचे अशोक थोरे, शिवसेना शहर प्रमुख सचिन बडदे, नगरसेवक किरण लुणिया, मर्चंट्स असोसिएशनचे अध्यक्ष विशाल पोफळे व संचालक, तहसीलदार प्रशांत पाटील, पोलीस उपअधीक्षक राहुल मदने, पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट, बाजार समितीचे माजी सभापती सचिन गुजर, लकी सेठी, मुख्याधिकारी समीर शेख यांच्यासह व्यापारी उपस्थित होते.

- Advertisement -

आ. कानडे म्हणाले, श्रीरामपुरातील बाजारपेठ सुरू होण्यासंदर्भात चार ते पाच आमदारांनी जिल्हाधिकार्‍यांशी संपर्क साधला. त्यांनी त्याचा आराखडा मागितला. दुकाने सुरू करताना व्यापार्‍यांनी नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. दुकानदार, उद्योग यांच्याशी निगडित असलेले कामगार, मजूर व नागरिक यांचा विचार करून दुकाने सुरू होणे आवश्यक आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

यावर प्रांताधिकारी अनिल पवार म्हणाले, शासनाचे नियम व जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाचे पालन करणे आमचे कर्तव्य आहे. जीवनावश्यक वस्तू, शेती संबंधित दुकाने, मेडिकल व एम.आय.डी.सी.मधील उद्योग सुरू झाले आहेत. बांधकाम व भाजीपाला विक्रेते यांचा प्रश्न सुटला आहे. उर्वरित दुकाने सुरू करण्यास हरकत नाही, परंतु त्यामध्ये कायद्याचे उल्लंघन व्हायला नको, असे मत व्यक्त त्यांनी व्यक्त केले.

बैठकीस मर्चंट्सचे उपाध्यक्ष उमेश अग्रवाल, सचिव अभय ओझा, अमोल कोलते, राहुल मुथ्था, विलास बोरावके यांच्यासह व्यापारी, नागरिक उपस्थित होते. पोफळे यांनी दुकाने सुरू करण्यासंदर्भात एक प्लॅन तयार करून आम्ही त्वरीत देऊ, त्यास आमदार कानडे यांनी जिल्हाधिकार्‍यांकडून मान्यता घेऊन द्यावी, अशी मागणी केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या