Friday, May 3, 2024
Homeनगरदुकाने सुरू करण्यासाठी पालिकेने ठरवून दिलेल्या नियमांचा फज्जा

दुकाने सुरू करण्यासाठी पालिकेने ठरवून दिलेल्या नियमांचा फज्जा

श्रीरामपूर (प्रतिनिधी)– शासनाने ठरवून दिलेल्या निर्देशानुसार दुकाने सुरू करण्याची परवानगी शहरातील व्यावसायिकांना दिली. परंतु काल शासनाच्या निर्देशांचे उल्लंघन होताना दिसले. शहरातील गांधी पुतळा परिसर तसेच हनुमान मंदिर परिसरात ग्राहकांनी दुकानात मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. त्यामुळे पालिकेने ठरवून दिलेल्या नियमांचा पूर्णपणे फज्जा उडालेला दिसला.

जिल्हाधिकार्‍यांनी दिलेल्या निर्देशानुसार व नगर पालिकेने केलेल्या नियोजनानुसार सुमारे 51 दिवसांच्या लॉकडाऊन नंतर श्रीरामपूर मधील दुकाने सुरू करण्यात आली. त्यासाठी योग्य नियमावली ही ठरवून देण्यात आली होती. त्याचे पालन न करणार्‍या दंडात्मक कारवाई केली जाणार, असे श्रीरामपूर पालिकेने ठरवून दिलेले असतानाही. काल तिसर्‍याच दिवशी शहरातील गांधी पुतळा परिसर व हनुमान मंदिर परिसर याठिकाणी दुकानासमोर ग्राहकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. या परिसरातील कोणत्याही व्यवसायिकांनी नियमांचे पालन केलेले दिसले नाही.

- Advertisement -

अगदी व्यावसायिकांनीही आपले वाहन ठरलेल्या ठिकाणी पार्किंग करून आपल्या दुकानात यावे, असे असतानाही दुकानांसमोर मोठ्या प्रमाणावर वाहनेही लावलेली दिसली. त्यामुळे पालिकेने नेमलेली पथके यांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या