Wednesday, November 13, 2024
Homeनगरनगरी मातीत ठरणार राज्याची टीम

नगरी मातीत ठरणार राज्याची टीम

कबड्डी स्पर्धा निवड चाचणी || 25 जिल्ह्याचे खेळाडू येणार

अहमदनगर (प्रतिनिधी) – राष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्राचा संघ निवडीसाठी नगरला तीन दिवस कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. नगरी मातीतून राज्याची टीम निवडली जाणार आहे. 10 वर्षांनंतर राज्याचा संघ निवडीचा मान नगरला यंदा मिळाल्याची माहिती दादाभाऊ कळमकर, प्रा. शशिकांत गाडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

- Advertisement -

राष्ट्रीय पातळीवरील कबड्डी स्पर्धा यंदा छत्तीसगढ येथे होणार आहे. या स्पर्धेसाठी राज्य पातळीवरचा संघ निवड करायाचा आहे. त्याकरीता नगरला यंदा 31 वी राज्य किशोरगट अजिंक्य कबड्डी स्पर्धा 23 ते 25 जानेवारी दरम्यान होत आहे. 2009 मध्ये नगरला अशा प्रकारची स्पर्धा झाली होती. त्यानंतर दहा वर्षांनी अशी स्पर्धा नगरात होत आहे.

नगरमधील रेसिडेन्सिअल हायस्कुलच्या मैदानात ही स्पर्धा होत असून त्यासाठी लाल मातीचे सहा मैदाने तयार करण्यात आली आहेत. 5 हजार प्रेक्षक बसतील अशी प्रेक्षक गॅलरीही तयार करण्यात आली आहे. राज्यातील 60 राष्ट्रीय दर्जाचे पंच येणार असून कबड्डी संघटनेचे पदाधिकारीही उपस्थित राहणार आहेत. राज्यातील 25 जिल्ह्यामधून मुली आणि मुलांचे 50 संघ या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. त्यांच्यातून राज्याची टीम निवडली जाणार आहे.

डे-नाईट मॅचेस
राज्यातील 50 संघांच्या डे-नाईट मॅचेस होणार असून खेळाडू, पंच आणि स्वयंसेवकांची भोजन व निवासाची व्यवस्था जिल्हा संघटनेने केली आहे. जिल्हा कबड्डी संघटनेच्या पुढाकारातून जिल्ह्यातील कबड्डी खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे तसेच प्रचार व प्रसार व्हावा या उद्देशातून या स्पर्धा नगरला होत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या