Friday, November 15, 2024
Homeनगरसंपाची दखल न घेतल्यास बेमुदत संप

संपाची दखल न घेतल्यास बेमुदत संप

कोपरगाव तालुका माध्यमिक शिक्षक संघाचा इशारा

वारी (वार्ताहर)- महाराष्ट्र राज्य शासकीय निमशासकीय कर्मचारी, शिक्षक कर्मचारी समन्वय समितीच्यावतीने कोपरगाव तालुका माध्यमिक शिक्षक संघाने मंगळवार दिनांक 8 जानेवारी 2020 रोजी कोपरगाव तालुक्यात एक दिवसीय संप करण्यात आला. लाक्षणिक संपातील न्याय्य मागण्यांची दखल घेणेबाबत तहसीलदार कोपरगाव यांना निवेदन देऊन मागणी करण्याबाबत शिक्षक कर्मचारी यांच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले.

- Advertisement -

सर्व कर्मचार्‍यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीबाबत केंद्र आणि राज्य सरकार गंभीर नाही. अन्य आर्थिक आणि सेवाविषयक बाबींबाबत दोन्ही सरकार उदासीन आहेत. त्यामुळे भविष्यात लढा अधिक तीव्र केला जाईल. यावेळी कोपरगाव तालुका माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष विलास वाकचौरे, सरचिटणीस नरेंद्र ठाकरे, अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष मकरंद कोर्‍हाळकर, जिल्हा प्रतिनिधी रामदास गायकवाड, उपाध्यक्ष भगवान शिंदे, सहकार्यवाह सुरेश वाबळे, सहचिटणीस मनोहर म्हैसमाळे, हिशोब तपासणीस दिलीप तुपसैंदर, ज्येष्ठ मार्गदर्शक गजानन शेटे, कोपरगाव तालुका टीडीएफ संघटनेचे अध्यक्ष कर्णासाहेब शिंदे, कोपरगाव तालुका कलाध्यापक संघाचे अध्यक्ष प्रवीण निळकंठ तसेच कोपरगाव तालुका माध्यमिक शिक्षक संघाचे आजी-माजी पदाधिकारी ज्येष्ठ मार्गदर्शक आदी उपस्थित होते. यावेळी नायब तहसीलदार मनीषा कुलकर्णी यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी तालुकाभरातील मोठ्या संख्येने माध्यमिक शिक्षक उपस्थित होते.

या निवेदनात सर्व कर्मचार्‍यांना 1982-84 ची जुनी पेन्शन योजना लागू करावी व अंशदायी पेन्शन योजना रद्द केली जावी. केंद्राप्रमाणे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करावे व 33 वर्षे सेवेची अट रद्द करावी. कंत्राटी धोरण बंद करून रिक्त पदे तत्काळ भरावीत. केंद्राप्रमाणे सर्व भत्ते लागू करावेत. अनुकंपा भरती तत्काळ व विनाअट करावी. केंद्राप्रमाणे महिला कर्मचारी यांना प्रसूती, बालसंगोपन रजा व अन्य सवलती लागू करणे. राज्यातील सर्व चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांची पदोन्नती शैक्षणिक पात्रतेनुसार करण्यात यावी.

राज्यातील शिक्षण व आरोग्य यांचेवर जीडीपीच्या 6 टक्के खर्च करण्यात यावा व आरोग्य सेवेचे खाजगीकरण बंद करण्यात यावे. सर्व कर्मचार्‍यांच्या अर्जित रजा साठविण्याची कमाल मर्यादा काढण्यात यावी. शिक्षकांना अशैक्षणिक कामे देण्यात येऊ नयेत. वरिष्ठ व निवड श्रेणी विनाअट सरसकट लागू करा. पदवीधर शिक्षकांना माध्यमिक वेतनश्रेणी लागू करा. शिक्षकेतर कर्मचार्‍यांचा आकृतिबंध लागू करून भरती सुरू करा, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या