Friday, May 3, 2024
Homeनाशिकत्र्यंबकेश्वर : वरसविहिर येथील ग्रामस्थांना दूषित व किडेयुक्त पाण्याचा पुरवठा; आरोग्य अधिकाऱ्यांची...

त्र्यंबकेश्वर : वरसविहिर येथील ग्रामस्थांना दूषित व किडेयुक्त पाण्याचा पुरवठा; आरोग्य अधिकाऱ्यांची पाहणी

वेळुंजे | वि.प्र : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अति दुर्गम भागातील वरसविहिर येथील ग्रामस्थांना दूषित व किडेयुक्त पाण्याचा पुरवठा होत असल्याची तक्रार येथील ग्रामस्थांनी केली आहे.

तालुका सभापती मोतीराम दिवे, जिल्हा परिषद सदस्य विनायक माळेकर, आरोग्य अधिकारी या ठिकाणी पाहणी केली असता ग्रामस्थांनी पाण्याची समस्या मांडली. (दि.२०) रोजी या अधिकाऱ्यांनी सदर पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरीवर भेट दिली. यावेळी ही बाब समोर आली.

- Advertisement -

सध्या त्र्यंबक तालुक्यातील अनेक गावांना भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. वरसविहिर येथे पाणी पुरवठा करणारी सार्वजनिक विहिर असून याकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष असल्याचे स्थानिकांनी सांगितले. या विहिरीच्या पाण्यात नियमित पणे टी.सी.एल.पावडर टाकून पाण्याची ओटीपी घेत नसल्याने पाण्यात किडे आढळून आले. हेच पाणी सध्या ग्रामस्थ पिण्यासाठी वापरात असल्याने आजार बाळावण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी पाहणी केली असता दूषित व किडेयुक्त पाणी असल्याचे निदर्शनास आले. तसेच ग्रामसेवक दहा ते पंधरा दिवसातून एकदा गावात येत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली.

यावेळी सभापती यांनी असलेल्या अधिकारी यांना पाणी शुद्धीकरण व अन्य अडचणी या तात्काळ सोडवण्याच्या सूचना केल्या. अधिकारी वर्गाने लवकरच ही समस्या सोडवणार असे आश्वासन यावेळी ग्रामस्थांना दिले.

- Advertisment -

ताज्या बातम्या