Friday, May 3, 2024
Homeनाशिकत्र्यंबकेश्वर शहरात पाणी टंचाईला सुरवात

त्र्यंबकेश्वर शहरात पाणी टंचाईला सुरवात

त्र्यंबकेश्वर : मे महिन्याच्या सुरवातीलाच शहरात भागात पाणी टंचाई जाणवत आहे.

शहरातील पंचलिंग ब्रम्हगिरी या परिसरात पाणी टंचाई जाणवते आहे. तसेच गंगाद्वारवरील लोक एक किलोमीटर पायपीट करीत ब्रम्हगिरी पठारावरील भात खळा येथून पाणी आणत आहेत. येथील पाण्याची पातळी देखील खालावली असू यासाठी उपाययोजना करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

- Advertisement -

शहरातील आयपीएल ग्रुपने भातखळा येथील पडीक जुन्या विहिरीचे नूतनीकरण गेल्या वर्षी केले होते. त्यामुळे यंदा पाणी मे पर्यंत पुरले आहे. पण आता पाणी तळाकडे कमी झाले आहे. इंडिखिंडी मेट येथील विहिर खोल गेली आहे. यामुळे येथील परिसराला सध्या पाणी टंचाई चे सावट गडद होत चालले आहे.

याबाबत पंचायत समितीने वेळीच याबाबत नियोजन करावे असे नागरिक सांगत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या