Saturday, March 29, 2025
Homeमहाराष्ट्रManoj Jarange : "लक्ष्मण हाकेंचे उपोषण सरकार पुरस्कृत"; जरांगेंचा गंभीर आरोप

Manoj Jarange : “लक्ष्मण हाकेंचे उपोषण सरकार पुरस्कृत”; जरांगेंचा गंभीर आरोप

मुंबई | Mumbai

मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी समाजाला (OBC Community) धक्का लागणार नाही, याची लेखी हमी सरकारने द्यावी या मागणीसाठी आंतरवाली सराटीच्या वेशीवर ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी नवनाथ वाघमारे यांचे आमरण उपोषण सुरू आहे. या उपोषणादरम्यान हाके आणि त्यांच्या सहकाऱ्याची तब्येत खालावत चालली आहे. त्यामुळे ओबीसी संघटनांकडून काही ठिकाणी कडकडीत बंद ठेवत आणि रस्त्यावर टायर जाळून सरकारचा निषेध नोंदवला जात आहे. अशातच आज मराठा आरक्षणाचे उपोषणकर्ते मनोज जरांगेंनी ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंच्या उपोषणावर टीका करत हे ‘उपोषण सरकार पुरस्कृत असल्याचा’ आरोप केला आहे. त्यामुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik News : २५ कोटींचे नाट्यगृह बंद अवस्थेत

यावेळी जरांगे म्हणाले की, “मराठा आणि ओबीसी समाजाच्या उपोषणामुळे (Hunger Strike) राज्य सरकार अजिबात कोंडीत सापडलेले नाही. उलट तेच उपोषण उभे करीत आहेत. ओबीसींचे उपोषण हे सरकार पुरस्कृत आहे. अगोदरच्या आणि आताच्या उपोषणात खूप मोठा फरक आहे. उपोषणकर्त्यांना राजकीय नेते टप्प्याटप्याने भेटायला येत आहेत. ही त्यांची चळवळ आहे. मात्र, काहीही घडले तरी मराठा समाज आता मागे हटणार नाही. आम्ही ओबीसी प्रवर्गातून आरक्षण घेऊनच दाखवू”, असा इशारा मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी दिला आहे.

हे देखील वाचा : संपादकीय : १९ जून २०२४ – मज आवडते ही मनापासूनी शाळा

पुढे ते म्हणाले की, “ओबीसींच्या उपोषणाला माझा विरोध नाही. मी त्यांच्यावर उत्तर देणार नाही. मी किती वेळेला पाडा म्हणालो ते सांगा. आम्ही जेवढे दिवस म्हणतो विरोध नाही तर तुम्ही आता जास्त करत आहात. उपोषणाला बसलेल्या ओबीसी बांधवांना मी दोष देणार नाही. हे सर्व सरकार घडवून आणत आहे. आमचे उपोषण १७-१७ दिवस सुरू होते तरीही सरकारने (Government) आमच्याकडे ढुंकूनही पाहिले नव्हते. माझी मराठा समाजातील तरुणांना विनंती आहे, की आपल्याला कधी न मिळणारे आरक्षण आता मिळत आहे. त्यामुळे तुम्ही आत्महत्या करू नका. काही दिवसांनी तुम्हाला आरक्षण मिळणार आहे. तेव्हा नोकरीसाठी पुन्हा प्रयत्न करा. मी आरक्षण मिळवून देणार. आरक्षण मिळाल्यावर इच्छा पूर्ण होणार. नोकरी हुकू द्या तुमचा जीव महत्वाचा आहे. तुमचा जीव आमच्यासाठी महत्वाचा आहे. काळजी करू नका. तुम्हाला आरक्षण मिळवून दिल्याशिवाय मी हटत नाही.पुढील दिवसात तुम्हाला आरक्षण असेल”, असेही जरांगे यांनी म्हटले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik : ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

0
नाशिकरोड | प्रतिनिधी Nashikroad नाशिक-पुणे महामार्गावर असलेल्या गांधीनगर जवळील विजय ममता चित्रपटगृहाजवळ ट्रॅक्टरची वाहतूक करणाऱ्या ट्रकची एका तरुणाला जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात एक युवक...