Friday, May 3, 2024
Homeनगरचोर्‍या करणार्‍या टोळीचा छडा

चोर्‍या करणार्‍या टोळीचा छडा

अहमदनगर (प्रतिनिधी)- मोबाईल शॉपी फोडून पसार झालेल्या टोळीचा छडा लावण्यात पोलिसांना यश मिळाले. नाशिकमधून नगर एलसीबी पोलिसांना एकाला अटक केली असून तिघे पसार झाले आहेत.

योगेश काळू निरगुडे (रा. शिवडे, ता. सिन्नर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. मयुर अशोक कातोरे, सोमनाथ कातोरे, अमोल भाऊराव भगत (सर्व रा. शिवडी, सिन्नर) अशी फरारी आरोपींची नावे आहेत. या चौघांनी मिळून अकोले तालुक्यातील देवठाण येथील संजय शिवनाथ शेळके यांचे सार्थक मोबाईल शॉपी नावाचे दुकान फोडून 22 हजार 590 रुपयांचे मोबाईल लंपास केले होते. ही चोरी निरगुडे याच्या टोळीने केल्याची माहिती एलसीबीचे पीआय अनिल कटके यांना मिळाली. त्यांनी पथक तयार करत कारवाईचे आदेश दिले. हवालदार बबन मखरे, शंकर चौधरी, दीपक शिंदे, लक्ष्मण खोकले, सचिन आडबल, ज्ञानेश्वर शिंदे, रविकिरण सोनटक्के, रवींद्र घुंगासे, सागर सुलाने, बबन बेरड यांच्या पथकाने योगेश शिवडे यास ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखविताच त्याने टोळीतील तिघांची नावे सांगितली. त्यानुसार पोलीस इतर आरोपींच्या शोधासाठी गेले, पण ते मिळून आले नाही. पकडलेल्या निरगुडे यास अकोले पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

- Advertisement -

……………………

घोटीतही गुन्हा

निरगुडे याने चोरी केलेला एक मोबाईल पोलिसांना काढून दिला. इतर मोबाईल हे फरारी आरोपींकडे असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. निरगुडे विरोधात घोटी पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. निरगुडे हा सराईत गुन्हेगार असल्याचे पोलीस निरीक्षक कटके यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या