नाशिक रोड l Nashik Road
लहवीत येथिल माळवाडी वस्तीवर राहणारे सुनील काणे (वय 39) या इसमावर बिबट्याने आज सकाळी 7 वाजेच्या सुमारास हल्ला चढवला.
- Advertisement -
त्यात ते जखमी झाले असून, त्यांना बिटको हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळता वनविभागाचे वनरक्षक विजय पाटील यांनी सुनील काणे यांना भेट दिली. या घटने नंतर भागात पिंजरा लावण्यात आला आहे