Thursday, May 2, 2024
Homeधुळेएलईडी : नवीन लावण्यात घोळ, जुने गेले कुठे?

एलईडी : नवीन लावण्यात घोळ, जुने गेले कुठे?

धुळे । Dhule। प्रतिनिधी

मनपाचे (Municipal Corporation) 13 कोटी व 8 कोटी नगरोत्थानचे (Urbanization) असे 21 कोटी रुपये खर्चून शहरात एलईडी (LED Light) लाईन लावण्याचे काम सुरु आहे. मात्र या व्यवहारात अनियमीतता (Irregularity) असून आधिचे जुने 8 हजार लाईट (Light) कोणी लंपास (Lampas) केले असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसने (Nationalist Congress) उपस्थित केला आहे. दिवाळीपूर्वी संपूर्ण शहरात लाईट लावले नाहीत तर आयुक्तांच्या दालनासमोर फटाके फोडू असा इशारा देखील त्यांनी दिला. यासाठी आज पालिकेत निदर्शने करण्यात आले.

- Advertisement -

मनपाने नवीन एईडी लाईट लावण्याचा ठेका गुजरात मधील वल्लभ इलेक्ट्रीक या एजन्सीला दिला आहे. यात 150, 100, 90, 60, 45, 30, व्हॅटचे एलईडी लाईट पुरविण्याचे ठरले आहे. शहरातील जवळपास 17 हजार पोलवर नवीन एलईडी लावण्याचे काम संबंधित ठेकेदाराला देण्यात आल्याचे मनपातर्फे सांगितले जाते. परंतु अद्याप अनेकठिकाणी अंधारच आहे.

यासंदर्भात राष्ट्रवादीच्या वतीने आज मनपा प्रशासनाला निवेदन देवून आवारात निदर्शने करण्यात आली. यावेळी शहर जिल्हाध्यक्ष रणजीत राजे भोसले यांच्यासह कमलेश देवरे, कैलास चौधरी, महेंद्र शिरसाठ, जितू पाटील, दिपक देसले, मयुर देवरे, कुणाल पवार, राजू चौधरी, सरोजिनी कदम, शोभा आखाडे, तरुणा पाटील, वसीम बारी, वसीम खत्री, उमेर अन्सारी, हिमानी वाघ, यशवंत डोमाळे, संजय बगदे, अविनाश लोकरे, अनिल खैरनार, सागर चौगुले, कृष्णा गवळी, कुणाल वाघ, राजेंद्र चितोडकर, जमीर शेख, सलीम लंबू, हाशिम कुरेशी, अस्लम खाटीक, रईस काझी, स्वप्निल पाटील, दिपक देवरे, दर्शन पाटील, ज्ञानेश्वर माळी, जया सांळूके, राज कोळी, मोहन शिंदे, संजय सरग, शकीला बक्ष, सुरेखा नांद्रे अकबर भाई, राहूल पोळ, श्रृतिक पोळ, वामन मोहिते, उमेश महाजन, उमेश महाले, जयदिप बागूल, राजेंद्र सोलंकी, कुंदन पवार, हाजी हाशिम, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आंदोलन कर्त्यांनी म्हटले आहे की, संबंधित ठेकेदार व मनपाचे अधिकारी, पदाधिकारी यांनी संगतमताने लाईट खरेदी व लाईट लावण्याच्या कामांमध्ये मोठा घोळ व अनियमितता केली आहे. आतापर्यंत 11 हजार 700 इलेक्ट्रीक पोलवर एलईडी लाईट लावण्यात आल्याचा दावा मनपाच्या पदाधिकारी यांनी केला आहे. परंतु वस्तूस्थितीमध्ये अर्धे धुळे शहर आज अंधारात आहे. नवीन एलईडी लाईट लावतांना चालू असलेल्या परंतू पोलवरुन काढलेल्या लाईटांचे काय झाले? कुठे गेले? यांच्यातही मोठे गौडबंगाल आहे. जेवढे नवीन एलईडी लावले तेवढे जूने सुरु असलेल्या जवळपास 8 हजार लाईट कुठे आहेत, का ते लंपास केले? परस्पर विकले? याचीही चौकशी होणे गरजेचे आहे.

दोन वर्षांपासून महाराष्ट्र शासनाने राज्य नगरोत्थान योजनेअंतर्गत 8 कोटी रुपये शहरातील 19 रस्त्यांसाठी स्ट्रीट लाईट/एलईडी/पथदिवे बसविण्यासाठी मंजूर केले होते. दोन वर्ष झाले त्या कामाचे काय झाले? सदर काम बडगूजर कंपनी, नाशिक यांना देण्यात आले असून त्यांनी काम न करता बील काढण्याची शक्यता असल्याचे सांगितांनाच शहरात लाईट न लावल्यास आंदोलनाचा इशाराही दिला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या