Friday, April 25, 2025
Homeनगरविधानपरिषद सभापती पदासाठी भाजपकडून राम शिंदेंना उमेदवारी

विधानपरिषद सभापती पदासाठी भाजपकडून राम शिंदेंना उमेदवारी

आज भरणार अर्ज

नागपूर |प्रतिनिधी| Nagpur

गेली अडीच वर्षे रिक्त असलेल्या विधान परिषदेच्या सभापतिपदाची निवडणूक उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे यांनी मंगळवारी जाहीर केली. त्यानुसार उद्या, गुरुवार, 19 डिसेंबर रोजी सभापतिपदासाठी निवडणूक होईल. यासाठी आज, बुधवारी (18 डिसेंबर) दुपारी 12 वाजेपर्यंत अर्ज करता येईल. दरम्यान, महाराष्ट्र विधान परिषदेच्या सभापतीपदाच्या निवडणुकीसाठी भाजपचे राम शिंदे यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यांनी स्वतः ट्विट करून ही माहिती दिली आहे. भाजपच्या बहुमतामुळे त्यांची निवड होण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

काल विधान परिषदेचे कामकाज सुरू होताच डॉ. गोर्‍हे यांनी राज्यपाल पी.सी.राधाकृष्णन यांच्या आदेशानुसार सभापतिपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला. रामराजे नाईक-निंबाळकर यांची 7 जुलै 2022 रोजी सदस्यत्वाची मुदत संपल्यापासून विधान परिषदेचे सभापतीपद रिक्त आहे. त्यामुळे राज्यपालांनी महाराष्ट्र विधान परिषद नियमातील नियम 6 मधील तरतुदीला अनुसरून सभापती निवडणुकीसाठी 19 डिसेंबर हा दिवस निश्चित केला असल्याचे डॉ. गोर्‍हे यांनी सांगितले. या निवडणुकीसाठी 18 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत विधिमंडळाचे सचिव जितेंद्र भोळे यांच्याकड अर्ज करता येणार आहे. त्यानंतर अवघ्या पाच मिनिटांनी आलेल्या अर्जाची छाननी करून अंतिम उमेदवार निश्चित केले जातील, असेही उपसभापती यांनी सांगितले.

विधान परिषद सभापतिपदाची निवडणूक घोषित करताच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अ‍ॅड. अनिल परब यांनी डॉ. निलम गोर्‍हे यांना अडचणीत आणले. डॉ. गोर्‍हे या सभापतिपदासाठी इच्छुक असल्याची चर्चा असतानाच परब यांनी निवडणुकीचे निकष समजून घ्यायचे असल्याचे सांगत ज्यांच्याविरोधात अपात्रतेची याचिका न्यायालयात प्रलंबित आहे आणि त्याचा अजूनही निकाल लागलेला नाही, असा संबंधित उमेदवार सभापतिपदासाठी अर्ज करण्यास पात्र ठरू शकतो काय, अशी विचारणा त्यांनी केली. तर सभापतिपदाची मुदत 2022 मध्ये संपली होती. त्यानंतर ही निवडणूक किती कालावधीमध्ये घेणे बंधनकारक आहे.

दोन वर्षे निवडणुका झाल्या नसतील तर सभापतींची जागा रिक्त ठेवणे हे कायदेशीर आहे काय? याचाही खुलासा व्हायला हवा, अशी मागणी शरद पवार गटाचे आमदार शशिकांत शिंदे यांनी केली. दरम्यान, यासंदर्भात सभागृहात अनेकदा चर्चा झाली असून यासंदर्भात तीन किंवा सहा महिन्यात हे पद भरलेच पाहिजे अशी विहित मुदत नाही. यासंदर्भात संपूर्ण अभ्यास करूनच हा निर्णय घेतलेला आहे. तरीही याबाबत सर्व नियम तपासून उद्या निर्णय जाहीर करू, असे डॉ. गोर्‍हे यांनी जाहीर केले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

अजित

Ajit Pawar: अजित दादांनी केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या ‘मी पुन्हा येईन’...

0
पुणे | Pune मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पुस्तक लिहायला सांगणार असल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. अजित पवार यांच्या हस्ते आज पुण्यात राज्य कुटुंब कल्याण भवन...